नाशिक : गृह विभागाने पोलीस दलातील २३४ निशस्त्र निरीक्षकांच्या शुक्रवारी बदल्या केल्या आहेत. त्यात शहर आणि ग्रामीण पोलीस दलातील सहा जणांचा समावेश असून, शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक शंकर काळे यांची बदली नानवीज (दौंड) येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात करण्यात आल्याची माहिती आहे, तर नाशिक शहर व ग्रामीणसाठी ११ नवे अधिकारी आल्याचे वृत्त आहे. नाशिक ग्रामीणच्या दोघांसह एकाचा स्थानिक पातळीवर खांदेपालट झाला असून, प्रशासकीय कारणास्तव पाच जणांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. आस्थापना विभागाचे विशेष महानिरीक्षक राजकुमार व्हटकर यांनी हे बदली आदेश काढले आहेत. शहर पोलीस दलातील निरीक्षक बाळकृष्ण शेजाळ यांची शहरातच गुन्हे अन्वेशन प्रशिक्षण विभागात बदली झाली असून, नाशिक ग्रामीणच्या मधुकर गावित आणि पांडूरंग पाटील यांची जात पडताळणी विभागात बदली करण्यात आली आहे, तर ग्रामीण पोलीस दलातील श्रीप्रसाद यादव आणि संदीप कोळेकर यांची अनुक्रमे कोल्हापूर व सांगली येथे बदली करण्यात आली आहे. या बदली आदेशाबरोबरच गृह विभागाने प्रशासकीय कारणास्तव ६० निशस्त्र निरीक्षकांना दिलासा देत त्यांना एक वर्षाची मुदत वाढ दिली आहे. तर नाशिक शहरमध्ये नव्याने येणाºया अधिकाºयांमध्ये देविदास वांजळे व भरतकुमार सूर्यवंशी पोलीस अकादमीत सुरेश जाधव, सुनील गोसावी,रविंद्र राऊळ, शैलेश जाधव व शशिकांत महाजन तर नाशिक ग्रामीणसाठी सुनील महाडीक,सुरेशकुमार घुसर,अनिलकुमार बोरसे व सुरेश मनोरे या अधिकाºयांचा समावेश आहे.
२३४ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 12:47 AM