नामको बॅँक निवडणूक
सातपूर : शहरातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या दि नाशिक मर्चंट बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत २१ जागांसाठी २३८ अर्ज दाखल झालेले आहेत. निवडणुकीत तब्बल चार पॅनल तयार झाल्याने निवडणूक चुरशीची होणार असल्याचे दिसत आहे.नामकोच्या निवडणुकीसाठी सत्तारुढ गटाच्या प्रगती पॅनलसह सहकार व नम्रता पॅनल आणि आता प्रामाणिक असे चार पॅनल निवडणूक रिंगणात उतरले असून चारही पॅनलच्या वतीने मोर्चेबांधणी गतिमान झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवसअखेर सर्वसाधारण गटाच्या १८ जागांसाठी ललित मोदी, वसंत गिते, अनिल बूब, सुधाकर जाधव, देवदत्त जोशी, विजय साने, हेमंत धात्रक, अविनाश गोठी, नरेंद्र पवार, सुभाष नहार, कांतीलाल जैन, शिवदास डागा, जयप्रकाश जातेगावकर, हितेंद्र छाजेड, विनायक पांडे, महेंद्र छोरिया, रंजन ठाकरे, प्रफुल्ल संचेती, संतोष मंडलेचा, ललित नहार, शोभा छाजेड, प्रकाश दायमा, किसनलाल बंब, महेश लोढा, गजानन शेलार, बाळासाहेब रायते, शिवाजी पालकर, श्रीधर व्यवहारे, प्रथमेश गिते, सुरेश पाटील आदींसह २७६ अर्ज, तर महिला राखीव गटाच्या दोन जागांसाठी प्रतिभा जाधव, शोभा छाजेड, रजनी जातेगावकर, विनता लोढा, रेखा भुतडा, सपना हिरण, सोनल मंडलेचा, प्रज्ञा सावंत यांच्यासह ३५अर्ज, तर अनुसूचित जाती जमातीच्या एका जागेसाठी प्रशांत दिवे, यशवंत निकुळे, शामलाल मोहेकर, हरिभाऊ लासुरे, परशराम वाघेरे यांच्यासह १७ अर्ज दाखल झाले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मिलिंद भालेराव सहायक म्हणून सर्जेराव कांदळकर, जयेश अहेर, दिगंबर अवसारे काम पाहत आहेत.