मागील वर्षी स्थापन झालेल्या आदर्श सैनिक फाउंडेशनने शहीद जवान व माजी लष्करी जवानांच्या कुटुंबासाठी सुरू केलेले कार्य हे राष्ट्रहिताच्या दृष्टीने आवश्यक असे आहे. देशहितासाठी शहीद झालेल्या प्रत्येक लष्करी जवान व अधिकारी यांच्या कार्याची दखल घेण्यासाठी प्रत्येक देशवासीयाने कार्यासाठी पुढे येणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन मुंबई येथील समाजसेवक व जनजागृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत राऊत यांनी केले.
स्मारकापर्यंत जाण्यासाठी सुमारे १०० फूट रस्त्याचे काँक्रिटीकरणदेखील करून देण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमप्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या भाग्यश्री राऊत, कुस्तीपटू रामसिंग सांगा, वीर नारी रेखा खैरनार, मिसेस इंडिया इंटरनॅशनल ॲवॉर्डप्राप्त शिल्पी अवस्ती, नायक दीपचंद, कुंदन पारीक, वीरनारी रेखा खैरनार, सिन्नरच्या माजी सैनिक आघाडीचे अध्यक्ष मधुकर सोनवणे, शहीद आनेराव यांचे वडील दशरथ आनेराव, बंधू योगेश आनेराव, सुरेश आनेराव व कुटुंबीयांसह उपस्थित होते. प्रास्ताविक कुंदन पारीक यांनी केले. प्रमुख पाहुण्या मिसेस इंडिया इंटरनॅशनल शिल्पी अवस्ती यांनी सांगितले की, शहिदांच्या स्मृती जोपासल्यास पुढील पिढीला त्यांचे कार्य अवगत होत असते. संस्थेचे अध्यक्ष नायक दीपचंद यांनी देशसेवेसाठी त्यागाची भावना असणे गरजेचे असून शहिदांच्या बलिदानामुळे त्या गावची ओळख ही देशभर होत असल्याचे सांगितले. कार्यक्रमास सरपंच रामनाथ शिंदे, वीरपिता तुकाराम झनकर, अर्जुन ढाकणे, वीरमाता कृष्णाबाई बोडके, वीरपत्नी हिराबाई पारस्कर, भारती पगार, सुषमा मोरे, कमल लहाने, यशोदा गोसावी, माजी सैनिक खंडू पवार, सुभेदार डहाळे, रवींद्र राजोळे, योगेश ठोक, राजेंद्र कातोरे, भगवान कातोरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन विजय कातोरे, प्रशांत धिवंदे यांनी केले. यावेळी परिसरातील सर्व आजीमाजी सैनिकांचा स्मृतिचिन्ह व शाल देत सन्मान करण्यात आला.
छायाचित्र - १७ सोनारी
सोनारी येथे डौलाने फडकत असलेला ६० फूट स्तंभावरील २४ फुटी तिरंगा.
170821\17nsk_7_17082021_13.jpg
सोनारीत फडकवला तिरंगा