नाशिक : अंबड गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अश्विननगर, राणाप्रताप चौक, गणेश चौक यांसह परिसरातील १३ घरफोड्यांची उकल केली असून, चौघा संशयितांना अटक केली आहे़ यामध्ये दोन विधिसंघर्षित बालकांचा समावेश असून, या चौघांकडून १९ लाख रुपये किमतीचे ६५२ ग्रॅम सोने (६५ तोळे) व पाच लाख रुपये किमतीचे टाटा सफारी वाहन जप्त केल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांनी शुक्रवारी (दि़ ६) पत्रकार परिषदेत दिली़विशेष म्हणजे सोशल मीडिया वा मोबाइलचा वापर न करणाऱ्या या सराईतांना केवळ विधिसंघर्षित बालकांकडून मिळालेल्या वर्णनावरून अटक केली़ दरम्यान, या दोघांना न्यायालयाने सोमवारपर्यंत (दि़ ९) पोलीस कोठडी सुनावली आहे़अंबड पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाच्या अधिकाºयांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दोन विधिसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले़ या दोघांची चौकशी केल्यानंतर त्यांनी परिसरात घरफोड्या केल्याची कबुली देऊन चाळीस ग्रॅम सोन्याचे दागिने व नऊ मोबाइल पोलिसांना काढून दिले़ त्यातच परिसरातील बहुतांशी घरफोड्या खिडकीचे गज कापून झाल्याचे समोर आल्याने या दोघांची अधिक चौकशी केल्यानंतर त्यांनी सिडकोतील दत्त चौकातील एक मुलगा खिडकीचे गज कापून घरफोडी करतो, अशी माहिती देऊन त्याचे केवळ वर्णन सांगितले़ या संशयिताचा पत्ता व त्याचे नावही माहिती नव्हते़अंबड पोलिसांनी तीन दिवस हा परिसर पिंजून काढल्यानंतर उपनिरीक्षक चव्हाण यांना मिळालेल्या गोपनीय माहितीतून रात्री बेरात्री एक मुलगा घरी येत असल्याचे समजले. मात्र, तो कुठलाही मोबाइल वा सोशल मीडियाचा वापर करीत नसल्याने तपास करणे अवघड झाले होते़; मात्र पोलिसांनी विकास पांडुरंग झाडे (१९, व्ही.एन. नाईक शाळेजवळ, दत्त चौक सिडको) यास ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने साथीदार आकाश विश्वनाथ वानखेडे (रा. सुखदेवनगर, दर्ग्याजवळ, पाथर्डी शिवार, इंदिरानगर) सोबत परिसरातील तेरा घरफोड्यांची कबुली दिली़पोलिसांनी झाडेला अटक केल्यानंतर वानखेडे फरार झाला होता, त्यास त्र्यंबकेश्वरहून ताब्यात घेतल्यानंतर डिसेंबर २०१७ पासून आतापर्यंत १३ घरफोड्यांची कबुली दिली़ पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे, पोलीस उपनिरीक्षक तुषार चव्हाण, पोलीस हवालदार भास्कर मल्ले, पोलीस नाईकदत्तात्रय गवारे, दुष्यंत जोपळे, अविनाश देवरे, विजय वरंदळ, चंद्रकांत गवळी, धनंजय दोबाडे, पोलीस शिपाई विपुल गायकवाड, हेमंत अहेर, दीपक वाणी, मनोहर कोळी, नितीन फुलमाळी यांनी ही कामगिरी केली़दागिने पुरले जमिनीतअंबड पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक तुषार चव्हाण यांना मिळालेल्या माहितीवरून दोन विधिसंघर्षित बालकांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्यांनी घरफोडीची कबुली दिली़ त्यांच्याकडून विविध कंपन्यांचे नऊ मोबाइल तसेच ४० ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले़ विशेष म्हणजे हे दागिने त्यांनी जमिनीमध्ये पुरले होते़
२४ लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2018 12:50 AM
नाशिक : अंबड गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अश्विननगर, राणाप्रताप चौक, गणेश चौक यांसह परिसरातील १३ घरफोड्यांची उकल केली असून, चौघा संशयितांना अटक केली आहे़ यामध्ये दोन विधिसंघर्षित बालकांचा समावेश असून, या चौघांकडून १९ लाख रुपये किमतीचे ६५२ ग्रॅम सोने (६५ तोळे) व पाच लाख रुपये किमतीचे टाटा सफारी वाहन जप्त केल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांनी शुक्रवारी (दि़ ६) पत्रकार परिषदेत दिली़
ठळक मुद्देसराईत घरफोड्यांना अटक १३ घरफोड्यांची उकल