लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव : शहरातील कोरोना बाधितांच्या संख्येमध्ये एकाच दिवसात २४ नविन रु ग्णांची वाढ झाली असून ग्रामीण भागात १२ नवीन रु ग्ण आढळून आले आहेत. बोराळे ४, परधाडी ४, साकोरे ३, वडाळी १ अशी रु ग्ण संख्या आहे.तालुक्यात आतापर्यंत एकूण ६१२ कोरोना पॉझीटिव्ह रु ग्ण सापडले असून उपचाराखाली १५९ रु ग्ण आहेत. २१ जणांचा मृत्यू झाला असून ४३२ जण बरे होऊन घरी गेले आहेत. आज दुपारपर्यंत नांदगाव ५२, मनमाड ५० व ग्रामीण भागात ५७ रु ग्ण उपचार घेत आहेत.शहरातील सोनार व कासार गल्लीत निम्मे रु ग्ण असून उर्वीरत रु ग्ण इतरत्र आहेत. शासकिय व निमशासकिय यंत्रणेवरचा ताण दिवसेंदिवस वाढत असून आरोग्य विभागाचे तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. अशोक ससाणे, डॉ. रोहन बोरसे दिवसरात्र कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील सारताळे येथील कोविड केअर सेंटर मध्ये सध्या ३६ रु ग्ण उपचार घेत आहेत.नांदगाव नगर परिषद हद्दीत कंटन्मेटझोनचे अजिबात पालन होत नाही. सामाजिक अंतर व मास्क लावणे यावर नियंत्रण नाही. व्यापारी वर्ग शिस्त पाळत नाही. या सर्वांना कोणाचाच धाक नसल्याने शहरात रु ग्ण संख्या वाढत चालली आहे.- डॉ. अशोक ससाणे, तालुका आरोग्य अधिकारी.
नांदगाव शहरात २४ नवे कोरोना रु ग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2020 3:43 PM
नांदगाव : शहरातील कोरोना बाधितांच्या संख्येमध्ये एकाच दिवसात २४ नविन रु ग्णांची वाढ झाली असून ग्रामीण भागात १२ नवीन रु ग्ण आढळून आले आहेत. बोराळे ४, परधाडी ४, साकोरे ३, वडाळी १ अशी रु ग्ण संख्या आहे.
ठळक मुद्देशहरातील सोनार व कासार गल्लीत निम्मे रु ग्ण असून उर्वीरत रु ग्ण इतरत्र आहेत.