नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात २४.५२ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, महापालिकेकडे ६१५.८६ दलघफू इतके पाणी आरक्षण शिल्लक आहे. सद्यस्थितीत महापालिकेकडून प्रतिदिन १०.८७ दलघफू पाणी उचलले जात आहे. त्यामुळे ३१ जुलैपर्यंत पाणी पुरेल, असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे.गंगापूर धरणात १३८१ दलघफू पाणीसाठा शिल्लक आहे, तर दारणात धरणात अवघा २३७ दलघफू पाणीसाठा शिल्लक आहे. महापालिकेने १५ आॅक्टोबर २०१५ पासून ते २२ मे २०१६ पर्यंत गंगापूर धरणातून २३८४ दलघफू तर दारणातून १६६ दलघफू पाणी उचलले आहे. अद्याप गंगापूर धरणात ६१५ दलघफू तर दारणात १३३ दलघफू पाणी आरक्षण शिल्लक आहे. महापालिकेकडून प्रतिदिन सरासरी ३०७ दशलक्ष लिटर्स पाणी उचलले जात आहे. (प्रतिनिधी)
धरणात २४ टक्के पाणीसाठा
By admin | Published: May 26, 2016 10:28 PM