मालेगाव : शहरासह तालुक्यात आज २५ कोरोनाबाधित रुग्ण मिळून आले असून, त्यात शहरातील सात तर ग्रामीण भागातील १८ रुग्ण आहेत. यात १३ पुरुष आणि १२ महिलांचा समावेश आहे.आज, सोमवारी ११९ जणांचे नमुने तपासून आले. त्यातील ९४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. यात शहरातील जयरामनगर भागातील ६० वर्षीय महिला, ६३ वर्षीय पुरुष, कुसुंबा रोडवर पाण्याच्या टाकीजवळ राहणारा २१ वर्षीय तरुण, मालेगाव कॅम्पातील विवेकानंद कॉलनीतील ३६ वर्षीय महिला, सम्यक चैतन्य अपार्टमेंटमधील ४९ वर्षीय महिला, मोहनपीर गल्लीतील ३८ वर्षीयपुरुष आणि कापसे गल्लीतील ५ वर्षांचा मुलगा कोरोनाबाधित मिळून आले.मालेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाने पुन्हा हातपाय पसरायला सुरुवात केल्याने ग्रामस्थांत घबराट पसरली आहे. चिखलओहोळ येथे ५० वर्षीय इसम, द्यानेतील वृंदावन चौकातील ६६ वर्षांची महिला, ४० वर्षांचा पुरुष, ३० वर्षीय महिला, अडीच वर्षांचा मुलगा, अजंग येथे ५० वर्षीय पुरुष, २१ वर्षीय महिला, ११ वर्षांचा मुलगा, ४३ वर्षांची महिला बाधित मिळून आली.चंदनपुरी येथे तर ५ जण बाधित मिळून आले. यात २२ वर्षीय तरुणी, एक वर्षाचा बालक, ४५ वर्षीय महिला, ४० वर्षीय महिला, २४ वर्षांचा तरुण बाधित मिळून आला.भायगाव येथे आम्रपाली कॉलनीत ४७ वर्षीय महिला, जळकू येथे४ आणि ५ वर्षे वयाची दोन मुले, निंबायत येथे रामनगर भागात २६ वर्षीय तरुण बाधित मिळून आला. शहरात अजूनही काही नागरिक हॉटेल्सवर मास्क न लावता गर्दी करीत असून, सोशल डिस्टन्सिंग पाळत नसल्याने चिंता व्यक्त होत आहे. प्रशासन कोरोनाला हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करीत असताना नागरिकांनीदेखील प्रतिसाद देण्याची गरज आहे.
मालेगाव तालुक्यात एकाच दिवशी २५ बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2020 11:38 PM
मालेगाव शहरासह तालुक्यात आज २५ कोरोनाबाधित रुग्ण मिळून आले असून, त्यात शहरातील सात तर ग्रामीण भागातील १८ रुग्ण आहेत. यात १३ पुरुष आणि १२ महिलांचा समावेश आहे.
ठळक मुद्देचिंतेत भर : कोरोनाचा पुन्हा कहर