लोकमत न्यूज नेटवर्क
वर्षभर भाविकांचा राबता असणारे वणी येथील सप्तशृंग देवीचा गड तीर्थस्थळ यादीत क वर्गात होते. ते आता बदलून ब वर्गात करण्यात आल्याची माहिती दादा भुसे यांनी दिली. ब वर्गात समावेश झाल्याने सप्तशृंग गडाच्या विकासासाठी २५ कोटींच्या आसपास निधी मिळणार असल्याने वाहनतळापासून ते पाणीपुरवठ्याच्या सोयीपर्यंत सर्वच सोेयीसुविधांचे प्रस्ताव तयार करावेत, असे आदेश त्यांनी यावेळी जिल्हा परिषदेला दिले.