नाशिक : कोणत्याही साथ-आजारांचा फैलाव रोखण्यासाठी साथग्रस्त भागात जाऊन साथीचे निदान करू शकणाऱ्या ह्यबीएसएल ३ह्ण या भारतच नव्हे तर चीनसह दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या पहिल्या लॅबचे शुक्रवारी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते नाशिकला लोकार्पण करण्यात आले. सुमारे २५ कोटी रुपये खर्च करून संपूर्णपणे ह्यमेड इन इंडियाह्ण स्वरुपातील ही मोबाईल लॅब आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे केंद्रीय सचिव डॉ. बलराम भार्गव आदी उपस्थित होते.मोबाईल लॅबमुळे महाराष्ट्रात साथीचा उद्रेक झालेल्या ठिकाणी ही मोबाईल लॅब पोहोचून अत्यल्प वेळेत तपासणी होऊन साथीबाबत निष्कर्ष काढता येईल. त्यामुळे रोगाचा प्रसार कमी कालावधीत रोखणे शक्य होणार असल्याचेही डॉ. पवार यांनी सांगितले. भविष्यात विषाणूंचा प्रसार पक्षी, प्राणी, धान्य, हवा तसेच शत्रू राष्ट्रांकडूनही होण्याचा धोका असल्याने मोबाईल लॅबची पूर्तता झाल्याचा आनंद आहे. कोणत्याही पेचप्रसंगाला सामोरे जाण्याची तयारी ही शांततेच्या काळातच करायची असते, असे डॉ. माधुरी कानिटकर यांनी सांगितले. दक्षिण आशियातील सर्वात मोठी प्रयोगशाळाया प्रयोगशाळेतून कोविडसारख्या इतरही सूक्ष्म किंवा अतिसूक्ष्म जिवाणूंपासून होणाऱ्या संभाव्य प्राणघातक आजारांचे निदान होऊ शकणार आहे. या प्रयोगशाळेमध्ये निदान आणि संशोधनाशी सुसंगत सुविधा व उपकरणे आहेत. नमुन्यांचा लॅबबाहेर तसेच लॅबमध्ये कार्यरत असणाऱ्या शास्त्रज्ञांनाही कोणताही धोका होऊ शकणार नाही. कालापव्यय टळणारदेशपातळीवर चार विभागांमध्ये चार याप्रमाणे तयार करण्यात येत असलेल्या कन्टेनमेंट प्रयोगशाळेतील ही पहिली मोबाईल लॅब आहे. उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम भारताच्या कोणत्याही भागात एखाद्या साथीचा, रोगाचा किंवा दुर्मीळ आजाराचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झाल्यास तेथे रुग्णांच्या नमुन्यांची जागेवरच तपासणी करता येणार आहे.
२५ कोटींची मेड इन इंडिया ह्यमोबाइल लॅबह्ण ठरणार रुग्णांसाठी वरदान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2022 1:25 AM