शहरं
Join us  
Trending Stories
1
Baba Siddique : जेलमध्ये सुपारी, ४ आठवडे रेकी, ३ शूटर, ६ गोळ्या...; सिद्दिकी हत्या प्रकरणातील धक्कादायक खुलासे
2
परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी राष्ट्रपतींचा मोठा निर्णय; जम्मू काश्मीरच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा मार्ग मोकळा केला
3
भीषण! गाझामधील शाळेवर इस्रायलचा एअर स्ट्राईक; लहान मुलांसह २० जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
छ. संभाजीनगरमध्ये पोलीस उपायुक्तांच्या मुलाने आयुष्य संपविले; आई - बाबांसाठी आरशावर लिहिली नोट
5
मारेकरी येऊन गेले होते सिद्दीकींच्या कार्यालयात, ...अन् फटाक्यांच्या आवाजात साधला नेम
6
जयशंकर पोहोचण्यापूर्वी इस्लामाबादमध्ये लष्कर तैनात; पाकिस्तानात दंगे भडकले
7
अंबानी कुटुंबीय १५००० कोटींच्या अँटिलियातील कोणत्या मजल्यावर राहतं माहितीये, कोणाला येण्याची परवानगी?
8
बाबा सिद्दीकींची हत्या करणाऱ्या धर्मराजचा बनाव उघड; समोर आली महत्त्वाची माहिती
9
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण : एक आरोपी म्हणाला, मै 17 साल का हूँ...! त्या आरोपीचे वय २१, १९, की १७?
10
भौम प्रदोष: ‘असे करा’ व्रत, महादेव होतील प्रसन्न; मंगळ दोषातून दिलासा, हनुमंत करतील कृपा
11
बाबा सिद्दीकी हत्येच्या कटाचे पुणे ‘कनेक्शन’
12
कोजागरी नवान्न पौर्णिमा: ५ राशींना अनुकूल, नोकरी-व्यापारात यश; इच्छापूर्ती, सुख-सौभाग्य काळ!
13
गुरुचरित्र आपल्याला नेमके काय शिकवते? ११ गोष्टी कालातीत, आजही येते प्रचिती; पाहा, गुरुपदेश
14
हिजबुल्लाहचा इस्रायलवर भीषण ड्रोन हल्ला; चार सैनिकांचा मृत्यू, ६० हून गंभीर जखमी
15
आजचे राशीभविष्य: ७ राशींना अनुकूल, धनलाभ योग; नोकरीत शुभवार्ता, प्रसन्नतेचा दिवस
16
एकत्र फोटोमुळे आरोपींची ओळख पटवण्यात आले यश
17
बिश्नोई गँगने स्वीकारली बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी? फेसबुक पोस्ट व्हायरल; आरोपी म्हणाला- 'मै १७ साल का...'
18
महाविकास आघाडीने केला ‘गद्दारांचा पंचनामा’; संयुक्त पत्रकार परिषदेतून महायुती सरकारवर निशाणा
19
तुरुंगातून बाहेर येताच आखला बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट; मुंबई, पुण्यात राहून रेकी, अडीच ते तीन लाखांची सुपारी
20
काँग्रेस नेते आज दिल्ली दरबारी; आढावा घेणार

सेवनिवृत्तीला अवघे 25 दिवस उरले असता जवानाला जम्मू-काश्मीरमध्ये आले वीरमरण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2021 3:59 PM

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील पतोंडामध्ये होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.

नाशिक : मुळ जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील पतोंडा गावाचे भूमिपुत्र असलेले भारतीय सेनेचे जवान गणेश सोनवणे (36) यांना जम्मू -काश्मीर येथे देशसेवा बजावताना वीरमरण आले. मंगळवारी (दि 5 )  कर्तव्यावर असताना त्यांचा अपघात झाला. यामध्ये ते जखमी झाले असता त्यांना जवळच्या लष्कराच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ते या महिन्याच्या अखेरीस भारतीय सेनेतून सेवानिवृत्त होणार होते.

सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाशिकमधील अंबड येथे वास्तव्यास असलेल्या त्यांच्या कुटूंबियांना त्यांच्या मृत्यूची माहिती कळवली आहे. गणेश सोनवणे यांना वीरमरण आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात्त पत्नी  दोन मुली ,आई  असा परिवार आहे.  त्यांचे पार्थिव बुधवारी (दि.6) सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास नाशिकच्या अंबड येथील निवासस्थानी येणार असून त्यांच्या मूळ गावी अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

25 दिवसात सेवा निवृत्त होणार होते 

काही दिवसांपूर्वीच गणेश यांचे आपल्या मुलीशी अखेरचं बोलणं झालं होतं. 'मी 30 ऑक्टोबरला सेवा निवृत्त होत आहे, त्यानंतर बेटा आपण सर्वजण सोबतच राहू आणि माझ्या साहेबांनी आणि माझ्या सोबतींनी मला एक चार चाकी गाडी गिफ्ट दिली आहे. आपण त्या गाडीने फिरू आणि खूपच मज्जा करू बेटा,' असे ते आपल्या मुलीला म्हणाले होते. पण, काही दिवसातच सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांनी फोन करून त्यांच्या निधनाचे वृत्त दिले. गणेश सोनवणे यांचे दोन्ही बंधूचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आणि मंगळवारी गणेश सोनवणे देशसेवा करीत असतांना शहीद झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :NashikनाशिकJammu Kashmirजम्मू-काश्मीर