नाशिक : आपल्या आई-वडिलांचा उतारवयात आधार घेत त्यांची ३० वर्षांपेक्षाही अधिक काळ सेवा करणाऱ्या जैन समाजातील २५ श्रावणकुमारांना ‘आदर्श पुत्र-पुत्रवधू’ पुरस्काराने प्रमोद मुनिजी म.सा., डॉ. समकितमुनीजी म.सा. यांच्या हस्ते गौरविण्यात आले.जैन श्वेतांबर स्थानकवासी श्री संघ, नाशिक संचलित आनंद महिला मंडळाच्या वतीने आर. के. जैनस्थानकात रविवारी (दि.११) पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानी मोहनलाल लोढा होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर श्री संघाचे संघपती राजमल भंडारी, उपसंघपती हरकचंद कांकरिया, शंकरलाल गांग, शांतीलाल चोरडिया, अॅड. विद्युलता तातेड आदी उपस्थित होते.दरम्यान, पाच दिवसांपासून सुरू असलेल्या श्रवणकुमार चरित्र प्रवचनमालेचाही रविवारी समारोप करण्यात आला. यावेळी माता-पित्यांची सेवा यावर आधारित दोन लघुनाटिकांचे यावेळी सादरीकरण करण्यात आले. याप्रसंगी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक अध्यक्ष सिंपल कांकरिया यांनी केले. सूत्रसंचालन प्रीती जैन, डॉ. सुषमा दुगड यांनी केले. आभार परिषदेच्या सचिव मंगला रायसोनी यांनी मानले.गुरूमहाराज समकितमुनिजी यांनी परिषदेच्या या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले. समाजाला अशा उपक्रमांची आज गरज आहे. माता-पित्यांची सेवा ईश्वरसेवा मानली गेली असून, आजच्या कलियुगात वृद्धाश्रमाची वाढती संख्या चिंताजनक बाब आहे. त्यामुळे अशा प्रकारचे पुरस्कार वितरण सोहळे नक्कीच समाजासाठी प्रेरणादायी आहे.
२५ श्रावणकुमारांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 12:53 AM
आपल्या आई-वडिलांचा उतारवयात आधार घेत त्यांची ३० वर्षांपेक्षाही अधिक काळ सेवा करणाऱ्या जैन समाजातील २५ श्रावणकुमारांना ‘आदर्श पुत्र-पुत्रवधू’ पुरस्काराने प्रमोद मुनिजी म.सा., डॉ. समकितमुनीजी म.सा. यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
ठळक मुद्देआनंद महिला परिषद : आदर्श पुत्र-पुत्रवधू पुरस्काराचे वितरण