सिन्नर : शहर व तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बुधवारी शहर व तालुक्यात दुपारपर्यंत २५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने ही एकाच दिवसातील सर्वाधिक संख्या आहे. तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २७० झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.सिन्नर ग्रामीण रुग्णालयात संशयित म्हणून दाखल असलेल्या ५६ रुग्णांचे अहवाल बुधवारी प्राप्त झाले. त्यात ३१ अहवाल निगेटिव्ह असून, २५ अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती आरोग्य यंत्रणेने दिली. शहरातील नऊ, तर ग्रामीण भागातील १५ व ठाणे येथील एकाचा या २५ मध्ये सहभाग आहे. शहरातील लोंढे गल्लीतील ५९ वर्षीय महिलेचा नाशिक येथे कोरोनावर उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याने तालुक्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आठ झाली आहे. सिन्नर ग्रामीण रुग्णालयातील ४५ स्वॅबचे अहवाल येणे बाकी आहेत, तर इंडियाबुल्स रुग्णालयात बुधवारी ३२ जणांचे स्वॅब घेण्यात आल्याची माहिती वैद्यकीय यंत्रणेने दिली. बुधवारी दुपारी शहरात ९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले तर ग्रामीण भागात १५ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. शहरातील नवनाथनगर येथे ४, विजयनगर येथे ३ तर गंगावेस व लोंढे गल्लीत प्रत्येकी १ रुग्ण पॉझिटिव्ह आला. पांढुर्ली येथे सर्वाधिक १३ रुग्ण कोरोनाबाधित मिळून आले.तर दापूर व ब्राम्हणवाडे येथे प्रत्येकी एक रुग्ण बाधीत आढळून आला. दरम्यान, तालुक्यातील १८७ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.-----------------------इंडिया बुल्स येथे कोविड रुग्णालय सुरूसिन्नर ग्रामीण रुग्णालयात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने येथील क्षमता संपल्याने गुळवंच शिवारातील इंडिया बुल्स कंपनीत दुसरे कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले. गेल्या काही दिवसांपूर्वीच येथे दुसरे रुग्णालय सुरू करण्याची तयारी केली होती. मात्र सोयीसुविधांचा अभाव असल्याने त्या पूर्ण झाल्यानंतर बुधवारी सकाळी सदर रुग्णालय सुरू करण्यात आले. याठिकाणी बुधवारी ३२ संशयित दाखल झाले आहेत.-------------७७ अहवालांची प्रतीक्षाबुधवारी दुपारी ५६ रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात तालुक्यातील २४, तर ठाणे येथील एक रुग्ण बाधित आढळून आला. सिन्नर ग्रामीण रुग्णालयातील ४५ तर नव्याने सुरू करण्यात आलेल्या इंडिया बुल्स येथील कोविड रुग्णालयात ३२ जणांचे स्वॅबचे अहवाल येण्याची प्रतीक्षा आहे. त्यामुळे ७७ संशयितांच्या अहवालाकडे आरोग्य यंत्रणेचे लक्ष लागून राहिले आहे.
सिन्नर तालुक्यात एकाच दिवसात आढळले २५ बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 9:46 PM