कळवण : कळवण आगारचा बस एका महिन्यात ८ लाख कि.मी. चालतात. त्यांना १ लाख ७४ हजार लिटर डिझेल लागते. त्यासाठी १ कोटी ५ लाख खर्च येतो. एका लिटर मध्ये साधारण ४.६ किमी अंतर एसटी चालते. या एका लिटरमागे कळवण आगाराची बस १०० मीटर अंतर जादा धावली तर आगाराचे महिन्याला २ लाख रु पये वाचतील तर वर्षाला २५ लाख रु पयांच्या इंधनाची बचत होणार आहे. त्यामुळे वर्षभर इंधन बचत करून आगाराचे उत्पन्न वाढवावे असे आवाहन आगारातील सर्व कर्मचाऱ्यांना आगार प्रमुख हेमंत पगार यांनी केले.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नाशिक विभाग व कळवण आगाराच्यावतीने १६ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०१९ दरम्यान इंधन बचत कार्यक्र म राबविण्यात येत आहे. या कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी हेमंत पगार तर प्रमुख अतिथी म्हणून कवी प्रा. किशोर पगार, कळवण तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष बापु देवरे, राकेश हिरे हे उपस्थित होते. कळवण हा डोंगरदºयांचा व गाव पाडे, वस्ती असलेला आदिवासी तालुका आहे. त्यामुळे घाट, वळण रस्ते, गावागावातील अंतर कमी असल्याने येथे वाहनांना जास्त इंधन लागते. त्यामुळे येथील आगाराच्या प्रत्येक घटकाने आपले काम चोख बजावल्यास छोट्या-छोट्या गोष्टीतून मोठी बचत होऊ शकते. त्याकरीता सर्वानी प्रयत्न करणे गरजेचे आहे. असे हेमंत पगार यांनी आवर्जून सांगितले.यावेळी कवी किशोर पगार यांनी मनोगत व्यक्त केले. वाहतूक निरीक्षक एस. सी. पवार यांनी कार्यक्र माचे प्रास्ताविक तर एम. पी. चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी आगारातील आर. एस. बोरसे, व्ही. व्ही. लव्हारे, एस. बी. मोरे , के. के. पवार, चालक, वाहक, हेल्पर आदी कर्मचारी उपस्थित होते.