शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
2
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
4
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
6
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
7
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
8
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
9
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
10
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
11
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
12
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
13
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
14
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
15
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
16
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
17
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
18
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
19
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
20
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला

२५ लाखांचा चिटफंड घोटाळा उघड; नाशिकमध्ये ४०० लोक आमिषाला पडले बळी

By अझहर शेख | Published: January 02, 2024 4:42 PM

संचालक महिलेसह पाच एजंटांना बेड्या 

नाशिक : ‘शून्य टक्क्याने लाखांत कर्ज घ्या अन् ४० टक्के सबसिडीही मिळवा...’ अशा पद्धतीने मार्केटिंग करत बालाजी फायनान्स सर्व्हिसेस व एस.के फायनान्स सर्व्हिसेस नावाने पाथर्डीफाटा भागात सुरू झालेल्या कंपन्यांनी शहरासह जिल्ह्यातील सुमारे ४००लोकांची फसवणूक केल्याचे प्रथमदर्शनी उघडकीस आले आहे. यामध्ये सुमारे १५० लोकांकडून प्रत्येकी दहा ते बारा हजार रूपये तर उर्वरित लोकांकडून चार ते पाच हजार रूपये घेत तोंडाला पाने पुसली आहेत. सुमारे २५ ते ३० लाखांपर्यंत या चिटफंड घोटाळ्याची व्याप्ती पोहचल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या सूत्रांनी सांगितले.

पोलिसांनी एका महिलेसह पाच एजंटांना बेड्या ठोकल्या आहेत. मूळ हैदराबादच्या बालाजी फायनान्स कंपनी व नाशिकच्या पाथर्डीफाटा येथील एस.के फायनान्स कंपनीच्या एकूण वीस संशयितांनी मिळून संगनमताने लेाकांना विना व्याज कर्जाचे आमिष दाखविण्यास सुरूवात केली. नोव्हेंबर महिन्यापासून हा प्रकार पाथर्डीफाटा भागात सुरू झाला. डिसेंबरअखेरपर्यंत नाशिक शहरासह इगतपुरी, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमध्येही याप्रकरणाची चर्चा पसरली. विना व्याज लाखांचे कर्ज व सबसिडी मिळणार असल्यामुळे नागरिकांनी पाथर्डीफाटा येथील कार्यालयात गर्दी वाढविली.

प्रोसेसिंग फी, करारनामा शुल्क, कर्जाचे सुरूवातीच्या दोन हप्त्याची रक्कम असे सुमारे दहा ते बारा हजार रूपये प्रत्येकाकडून उकळण्यास संशयितांनी सुरूवात केली. कोणालाही कर्जपुरवठा केला नाही. सुमारे ३०० ते ४०० लोकांची अशाप्रकारे फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला आहे. याप्रकरणी तक्रारदार नरेश महेश शेर (३१,रा.त्रिमुर्ती चौक) यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. यानंतर हा सगळा प्रकार पोलिसांनी तपासातून समोर आणला. याप्रकरणात संशयितांनी स्वत:ची नावे देखील खोटी वापरली असल्याचे समोर आले आहे. या दोन्ही कंपन्यांनी ज्या लोकांची फसवणूक केली असेल, त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेत संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरिक्षक संजय पिसे हे करत आहेत.

पाच दिवसांची पोलीस कोठडी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित महिला संचालक लावण्ण्या पटेल (३५,रा.सिडको), मोईजअली सय्यद (२६), नवनाथ खालकर (४५), सुगत औटे, उत्तम जाधव, विनोद जिनवाल उर्फ विकी (४०) या सहा संशयितांना अटक करण्यात आली आहे. त्यांना जिल्हा व सत्र न्यायालयापुढे पोलिसांनी हजर केले असता न्यायालयाने मंगळवारपर्यंत (दि.५) पोलीस कोठडी सुनावली आहे. संशयित पटेल यांनी एम.एस्सीपर्यंत(बायोलॉजी) शिक्षण घेतले आहे. त्यांच्या नावे कुठलाही परवाना नसून केवळ शॉपेक लायसन्सवर त्यांनी कार्यालय सुरू केले होते, असे तपासात पुढे आल्याचे पोलिसांनी सांगितले. एकुण १४ एजंट या कंपनीसाठी काम करत होते. त्या सर्वांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीNashikनाशिक