गंगापूररोड : संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेणाºया महिला मात्र स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे महिलांच्या आजारपणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने महिलांमध्ये स्वत:च्या आरोग्याविषयी जागृती निर्माण व्हावी, यासाठी शहरातील अडीच हजार महिला एकत्र आल्या होत्या. गोदाकाठालगत नव्या गोदापार्क परिसरात रविवारी (दि.४) ‘वुमन वॉकथॉन’चे आयोजन करण्यात आले होते. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या उपक्रमाचे उद्घाटन पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, विनिता सिंगल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धेतील विजेत्यांसह शिव छत्रपती पुरस्कारप्राप्त महिला खेळाडू यांना सन्मानित करण्यात आले. देशातील सर्वांत तरु ण आयर्न लेडी ठरलेली रविजा सिंगल हिचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यंदा हे या उपक्र माचे द्वितीय वर्ष होते. त्यासाठी प्रथमच आठ महिलांची दूत म्हणून निवड करण्यात आली. सकाळी ७ वाजता सुयोजित वृंदावन व्हॅलीच्या रस्त्यावरील वेस्टविंड मेडोज येथून या उपक्र मास सुरुवात झाली. स्पर्धेत उत्कृष्ट वेशभूषा गटात गायत्री अमृतकर, आर्या सुर्वे, उत्स्फूर्तता गटात सानिका राने, विनिता मोटकरी, अष्टपैलू व्यक्तिमत्त्व गटात सुजाता कुलकर्णी, मृणाल जगताप, तर सर्वोत्कृष्ट गट म्हणून शिवनेरी रणरागिणी, युनिटी इन डायव्हर्टसिटी यांनी पारितोषिक पटकावले. यावेळी शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त श्रद्धा नालमवार, श्रेया पाटील, अस्मिता दुधारे यांच्यासह भारतातील तरुण आयर्न लेडी ठरलेली रविजा सिंगल यांचाही सत्कार करण्यात आला. निसर्गाच्या सान्निध्यात गोदा किनारी तीन किलोमीटर अंतरात हा उपक्र म पार पडला. ‘एक चाल तिची, तिच्या चालीने, तिच्या सख्यांसोबत’ या धर्तीवर झालेल्या उपक्र मात दहा वर्षीय बालिकेपासून ८५ वर्षांपर्यंतच्या आजींचा उत्साह वाखण्याजोगा होता. गोदाकाठालगत नव्या गोदापार्क परिसरात ‘वुमन वॉकथॉन’चे आयोजन करण्यात आले होते. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या उपक्रमाला शहरातील विविध भागातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महिला आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यात मग्न असतात. परंतु, अनेकदा स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. ही बाब लक्षात घेऊन महिलांमध्ये स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने हा उपक्र म राबविला जात असल्याचे दाबक यांनी सांगितले.
अडीच हजार महिलांचा सहभाग वुमन वॉकथॉन : निरामय आरोग्यासाठी रहा प्रयत्नशील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2018 12:51 AM
गंगापूररोड : संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेणाºया महिला मात्र स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात.
ठळक मुद्देगोदापार्क परिसरात ‘वुमन वॉकथॉन’सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला