स्मार्ट बसथांबे वडापाव खाण्याचा अड्डा
नाशिक: अशोक स्तंभ ते त्र्यंबक रोडपर्यंत तयार करण्यात आलेल्या स्मार्ट रोडवर स्मार्ट असे बसथांबे बनविण्यात आलेले आहेत. याच मार्गावर आकर्षक असे बेंचेसदेखील तयार करण्यात आलेले आहेत. मात्र स्मार्ट रोडवरील थांबे आणि त्यावरील बेंचेस सर्वसामान्य नागरिकांना बसण्याऐवजी वडापाव खाणाऱ्यांचा टेबल बनले आहे. या रस्त्याच्या लगत असलेल्या वडापावची दुकान, चहाच्या टपऱ्या, पाणीपुरीवाले यांच्याकडील ग्राहकांना आयतेच टेबल झाले आहे. त्यामुळे स्मार्ट रोडचा वापर चुकीच्या पद्धतीने होत असल्याचेही दिसते.
(लायब्ररी फोटो)
सिद्धपिंप्रीतील तरुण ‘गरूड कमांडो’
नाशिक: सिद्धपिंप्री येथील देवेंद्र ढिकले याने एअर फोर्समधील गरूड कमांडोपदापर्यंत झेप घेतली आहे. दीड वर्षापूर्वी भारतातील तीन राज्यांमधील ५० हजार तरुण भरतीसाठी आले होते. शारीरिक आणि लेखी चाचणीनंतर मुलांची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली होती. यातून २१० मुलांची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली. त्यातील केवळ ७५ तरुणांनी प्रशिक्षण पूर्ण करून गरूड कमांडो म्हणून सैन्यात रूजू झाले. या कमांडोंचा नुकताच पदग्रहण सोहळा संपन्न झाला. सिद्धपिंप्री येथील देवेंद्र याने १९ रँकने हे प्रशिक्षण पूर्ण केले.
(फोटो)
एस.टी. पुन्हा धावली मदतीला
नाशिक: पावसामुळे इगतपुरी, कसाऱ्यात रेल्वे सेवा विस्कळीत हाेत असल्याने प्रवासात अडकलेल्या प्रवाशांसाठी आठवड्यातून दोनदा एसटीने जादा बसेसचे नियोजन केले होते. कसाऱ्यात दरड कोसळून रेल्वे मार्ग बंद झाल्यामुळे रेल्वे गाड्या थांबविण्यात आल्या होत्या. मदतकार्य एकीकडे सुरू असताना प्रवाशांना पुढील प्रवासासाठी एस.टी. बसने नियोजन करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात येतात. त्यानुसार राज्य परिवहन महामंडळाने रेल्वेतील प्रवाशांसाठी बसेसचे नियोजन केले हाेते. या माध्यमातून महामंडळाला उत्पन्नदेखील मिळाले. मात्र त्यापेक्षाही प्रवासी वाहतूक महत्त्वाची असल्याने तत्काळ गाड्या पोहोचविण्यात आल्या.
(मनपा बस फोटो वापरू शकता)
दक्षता बैठकीत रेशन दुकानदारांनी मांडल्या समस्या
नाशिक: नाशिक तालुका पुरवठा दक्षता समितीची बैठक आमदार सरोज अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. तहसील कार्यालयात आयोजित या बैठकीप्रसंगी आमदार अहिरे यांनी कार्डधारकांच्या कोणत्याही तक्रारी येणार नाहीत याची दक्षता घेण्याची सूचना केली. यावेळी रेशन दुकानदार संघटनेच्या वतीने अहिरे यांना निवेदन देण्यात आले. शासनाकडून दुकानदारांना विमाकवच मिळावे, कोरोनामुळे मृत झालेल्या रेशन दुकानदारांना आर्थिक मदत मिळावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी गटविकास अधिकारी सारिका बारी, पुरवठा निरीक्षक स्वप्निल थोरात, वसंत केदार, ढवळू फसाळे, पंचायत समिती सदस्य निवृत्ती महाराज कापसे, मारुती बनसोडे, माधव गायधनी, दिलीप नवले आदी उपस्थित होते.
(फोटो)
250721\25nsk_17_25072021_13.jpg~250721\25nsk_18_25072021_13.jpg
दक्षता बैठकीत रेशनदुकानदारां निवेदन~सिद्धपिंप्रितील तरुण ‘गरूड कमांडो’