नाशिक : देवळाली कॅम्प परिसरातील एका घरात जुगार सुरु असलेल्या जुगार अड्यावर छापा मारुन पोलिसांनी तब्बल २५ जणांना अटक केली आहे. देवळाली कॅम्प पोलिसांनी शुक्रवारी (दि. ११) रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास ही कारवाई केली. यावेळी आरोपींकडून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, मोबाईल असा सुमारे ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.देवळाली कॅम्पच्या झोपडपट्टी भागातील सहाचाळीतील सुनील शंकर गायकवाड यांच्यासह त्याचा अन्य २४ साथीदारांना शुक्रवारी रात्री सव्वाआठ वाजता देवळाली कॅम्प परिसरातील जिद्दीवली कलेक्शन दुकानासमोरील एका घरात बेकायदेशीररीत्या वरळी मेन व सोरट जुगार खेळताना आढळून आले. गोपनीय सुत्रांकडून पोलिसांना या प्रकारची माहिती मिळताच त्यांनी संशयित ठिकाणावर छापा टाकून केलेल्या कारवाईथ संशयित अंकावर पैसे लावून जुगार खेळताना आढळून आले. या सर्व संशयितांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम व मोबाईल असा ६६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार ए. व्ही. रेवगडे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक बी.एस. गायकवाड या प्र्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
देवळाली कॅम्प परिसरात जुगार अड्य़ावर छापापोलिासांच्या कारवाईत २५ जणांना अटक
देवळाली कॅम्पच्या झोपडपट्टी भागातील सहाचाळीतील सुनील शंकर गायकवाड यांच्यासह त्याचा अन्य २४ साथीदारांना शुक्रवारी रात्री सव्वाआठ वाजता देवळाली कॅम्प परिसरातील जिद्दीवली कलेक्शन दुकानासमोरील एका घरात बेकायदेशीररीत्या वरळी मेन व सोरट जुगार खेळताना आढळून आले. गोपनीय सुत्रांकडून पोलिसांना या प्रकारची माहिती मिळताच त्यांनी संशयित ठिकाणावर छापा टाकून केलेल्या कारवाईथ संशयित अंकावर पैसे लावून जुगार खेळताना आढळून आले. या सर्व संशयितांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम व मोबाईल असा ६६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार ए. व्ही. रेवगडे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक बी.एस. गायकवाड या प्र्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.