त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मेटकावरा, हर्षवाडी, उभरांडे, येल्याची मेट, खरोली, चंद्रयाची मेट, हुंब्याची मेट, वळण, खडकओहळ, विनायकनगर, होलदारनगर, सोमनाथनगर, शिवाजीनगर, गोधड्याचा पाडा, भागओहळ, करंजपाडा, कडेगव्हाण, बेरवळ, कौलपाडा, चौरापाडा, सावरपाडा, महादेवनगर अशी सुमारे २५ गावे कोरोनापासून दूर राहिली. या गावांमध्ये स्थानिक आरोग्य कर्मचारी, ग्रामसेवक, तलाठी, सरपंच, उपसरपंचांसह सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, आशा व अंगणवाडी सेविका, शिक्षकवर्ग यांच्या सामूहिक प्रयत्नांतून या गावांना कोरोनाची धग पोहोचू शकली नाही. वेळोवेळी केलेली सॅनिटायझर फवारणी, स्वच्छता, मास्क वापरणे, लसीकरण आदी कारणे त्यासाठी प्रभावी ठरली. विशेषत: गावकऱ्यांनी गावाची वेश ओलांडली नाही आणि पाहुण्यांनाही गावात प्रवेश दिला नाही. त्यामुळे कोरोना संसर्गापासून ही गावे कोसो दूर राहू शकली.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील २५ गावे कोरोनापासून सुरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2021 4:10 AM