तहसीलदार पंकज पवार यांनी दिंडोरी, वणी खेडगावसह अनेक गावांना भेटी देत नियम न पाळणारे व्यावसायिक व नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली. शहरातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. खेडोपाडी तहसीलदार पंकज पवार यांनी भेटी देऊन नियमांचे पालन करण्याचे आवाहन ग्रामस्थांना केले आहे. गेल्या वर्षीच्या लॉकडाऊननंतर मोठ्या अडचणीत आलेला व्यवसाय पुन्हा रुळावर येत असताना कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने व बाजारपेठेवर सातनंतर व शनिवार, रविवार निर्बंध आल्याने छोटे-मोठे व्यापारी अडचणीत सापडले आहेत. शहरातील भाजी बाजार शहराबाहेर गेल्याने ग्राहकसंख्या घटली आहे. शासनाने वीजबिल, जीएसटी, भाडे, मालमत्ता करात सूट द्यावी, अशी मागणी व्यावसायिक करत आहेत. भाडेतत्त्वावर दुकान घेऊन व्यवसाय करणाऱ्या काही व्यावसायिकांनी व्यवसायाला रामराम ठोकत दुसरा पर्याय निवडण्याची तयारी केली आहे. शहरातील भाजी बाजार जुन्या ठिकाणी पटांगणात सुरू करावा, अशी मागणी व्यावसायिकांनी केलीं आहे.
दिंडोरी तालुक्यात आठ दिवसांत २५० कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 4:15 AM