शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
3
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
4
Vinod Tawde News "मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
5
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
6
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
7
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
8
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले
9
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
10
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
11
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
12
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
13
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
14
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
15
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
16
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
17
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
18
Naga chaitanya-Sobhita wedding: शोभिता नेसणार कांजीवरम साडी पण...; काय आहे खास?
19
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
20
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन

२५० पथदीपांनी उजळणार स्टाईस

By admin | Published: February 18, 2016 10:48 PM

सिन्नर : कार्यक्षेत्रास संरक्षक भिंत बांधण्याचे काम प्रगतिपथावर

 सिन्नर : येथील सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीच्या (स्टाईस) ४१० एकर क्षेत्रावर २५० पथदीप बसविण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. औद्योगिक वसाहतीची सुरक्षितता अधिक मजबूत करण्यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती स्टाईसचे संचालक नामकर्ण आवारे यांनी पत्रकार परिषदेत दिली. स्टाईसच्या संचालक मंडळास कार्यभार स्वीकारून सहा महिने पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अध्यक्ष अरुण चव्हाणके, उपाध्यक्ष पंडित लोंढे, संचालक प्रभाकर बडगुजर, सुनील कुंदे, अविनाश तांबे, विठ्ठल जपे, अनिल दळवी, व्यवस्थापक कमलाकर पोटे आदि यावेळी उपस्थित होते. स्टाईसच्या संपूर्ण कार्यक्षेत्रास संरक्षक भिंत बांधण्याचे काम सुरू आहे. २५० पथदीप बसविण्याच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच प्रत्यक्ष कामास प्रारंभ होणार आहे. त्यामुळे स्टाईसमधील उद्योगांची सुरक्षितता मजबूत होणार असल्याचे आवारे यांनी सांगितले. औद्योगिक वसाहतींमध्ये सकारात्मक चित्र निर्माण करून नवीन उद्योगांसाठी पूरक वातावरण देण्यासाठी स्टाईस प्रयत्नशील असल्याचे ते यावेळी म्हणाले. प्रमोद महाजन किमान कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत स्टाईसच्या कार्यालयात कामगारांसाठी मोफत प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यामुळे उद्योजकांना जाणवणारा कुशल कामगारांचा तुटवडा दूर होण्यास मदत होणार आहे. औद्योगिक वसाहतीतील समस्या सोडविण्यासाठी ३७५ सदस्यांचा समावेश असलेल्या १३ समित्या स्थापन करण्यात आल्या आहे. प्रत्येक कारखान्यातील व्यवस्थापकांनाही या समित्यांमध्ये सहभागी करून घेण्यात आले आहे. त्यामुळे निर्माण होऊ पाहणाऱ्या अडचणींवरही तत्काळ तोडगा निघत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. (वार्ताहर)