नाशिक : आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना तत्काळ वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘अटल आरोग्य वाहिनी’ अभियानांतर्गत नाशिक विभागातील आश्रमशाळांसाठी २६ रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विधानभवनाच्या प्रवेशद्वाराजवळ या अभियानाचे उद्घाटन करण्यात आले, तर नाशिकमध्ये आदिवासी विकास भवनसमोर अधिकाºयांनी रुग्णवाहिकांचे लोकार्पण केले. राज्यातील दुर्गम, आदिवासी, डोंगराळ भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना तत्काळ आरोग्यसेवा मिळावी आणि उपचाराविना त्यांना राहता येऊ नये यासाठी रुग्णवाहिका सुविधा पुरविण्यात आली आहे. या सुविधेमुळे आदिवासी विद्यार्थ्यांना दुहेरी लाभ होणार आहे. एकतर त्यांची नियमित आरोग्य तपासणी होऊन त्यांना असणाºया आजाराविषयीची माहिती डॅशबोर्डवर उपलब्ध होईल. तसेच तपासणीअंति आढळणाºया अथवा अकस्मात उद्भवणाºया आजारावर उपचार केले जातील.प्रत्येकी चार ते सहा आश्रमशाळा व एकलव्य निवासी शाळांचा एक समूह, असे ४८ क्लस्टर तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक क्लस्टरसाठी एक याप्रमाणे ४८ सुसज्ज रुग्णवाहिका २४ तास मैदानात असतील. बेसिक लाइफ सपोर्ट (बीएलएस)सह सज्ज असणाºया या रुग्णवाहिकांमध्ये दोन डॉक्टर्स व एक आरोग्य सहायक उपलब्ध असणार आहे.या योजनेअंतर्गत नाशिक विभागातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर या पाच जिल्ह्यांसाठी २६ अद्ययावत रुग्णवाहिकांचा समावेश आहे. या सर्व रुग्णवाहिका सायंकाळी आदिवासी विकास विभागाचे सहआयुक्त दशरथ पानमंद, अपर आयुक्त गिरीश सरोदे, प्रकल्प अधिकारी कुमार आशीर्वाद, बाळासाहेब कंक्राळे, प्रदीप पोळ, शशिकला आहिरराव, एस. एस. पवार, एस. आर. गायकवाड, विजय मोरे, नीलेश अहिरे, सुरेश जाधव, आनंद तारगे, संजय पाटील, जिल्हा परिषदेचे आरोग्य शिक्षण सभापती यतिंद्र पाटील यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष सेवेत दाखल करण्यात आल्या. यावेळी आदिवासी विकास विभागातील अधिकारी, बिव्हिजीचे पदाधिकारी तसेच सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.केंद्र शासनाच्या योजनेतून या रुग्णवाहिका आदिवासी विद्यार्थ्यांसाठी जीवनवाहिनी ठरणार आहेत. धुळे, नंदुरबार, तळोदा, कळवण आणि राजूर प्रकल्पासाठी रुग्णवाहिका रवाना करण्यात येणार आहेत. बीव्हीजीच्या अधिपत्याखाली या रुग्णवाहिका आरोग्य विभागाच्या १०८ रुग्णवाहिकेप्रमाणेच काम करणार आहेत.- दशरथ पानमंद, सहआयुक्त
आश्रमशाळांसाठी २६ रुग्णवाहिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 12:45 AM