खर्डे : येथील खर्डे विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी बुधवारी (दि. ३०) माघारीच्या अंतिम दिवशी ५२ उमेदवारी अर्जांपैकी २६ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने सोसायटीच्या १३ जागांसाठी २६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वसंत गवळी यांनी दिली.खर्डे विकास सोसायटीसाठी मंगळवारी (दि. १५) अर्ज छाननी करण्यात आली. यात दोन अर्ज अवैध ठरविण्यात आले, तर ५२ अर्ज वैध ठरविण्यात आले होते. निवडणूक बिनविरोध होईल असा कयास बांधण्यात आला होता. मात्र तो फोल ठरला.बुधवारी (दि. ३०) माघारीच्या दिवशी ५२ पैकी २६ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने आता १३ जागांसाठी २६ उमेदवार समोरासमोर उभे ठाकले आहेत.गटनिहाय उमेदवार पुढीलप्रमाणे - (सर्वसाधारण गट) मांगू गोविंदा गांगुर्डे, रामदास नामदेव गांगुर्डे, तुकाराम शामभाऊ चव्हाण, कारभारी पंडित जाधव, दोधा रामभाऊ जाधव, वसंत लखा जाधव, हंसराज नारायण जाधव, माधव रामदास ठोंबरे, अनिल भाऊराव देवरे, दत्तात्रेय वामन देवरे, भरत बाबुराव देवरे, सोमनाथ मोतीराम देवरे, पुंजाराम महादू पवार, रमेश वामन पवार, विष्णू जयराम पवार, सुभाष मुरलीधर मोरे.(अनुसूचित जाती जमाती) दादाजी पोपट जाधव, उत्तम भिका थोरात.(महिला प्रतिनिधी) निर्मला तानाजी गांगुर्डे, दीपाली कृष्णा जाधव, मीराबाई वसंत जाधव, जयश्री संदीप देवरे.(इतर मागास प्रतिनिधी) दत्तात्रेय जगन्नाथ जाधव, संदीप अशोक पवार.(भटक्या विमुक्त जाती जमाती) रामकृष्ण धोंडू कुवर, युवराज बाबुराव मोरे याप्रमाणे आहेत.खर्डे विकास सोसायटीच्या १३ जागांसाठी रविवारी १० एप्रिल २०२२ रोजी मतदान घेण्यात येऊन, त्याच दिवशी मतमोजणी करण्यात येणार आहे.दोन पॅनलमध्ये होणाऱ्या या चुरशीच्या लढतीकडे संपूर्ण गावासह तालुक्याचे लक्ष लागून आहे. ऐन उन्हाळ्यात सोसायटी निवडणुकीचा धुरळा उडणार असल्याने गावात राजकीय वातावरण तापणार आहे.
खर्डे सोसायटी निवडणुकीत २६ उमेदवार रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2022 10:52 PM
खर्डे : येथील खर्डे विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी बुधवारी (दि. ३०) माघारीच्या अंतिम दिवशी ५२ उमेदवारी अर्जांपैकी २६ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने सोसायटीच्या १३ जागांसाठी २६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वसंत गवळी यांनी दिली.
ठळक मुद्दे२६ जणांनी घेतली माघार : १३ जागांसाठी १० एप्रिलला मतदान