चांदवड : तालुक्यातील राहुड घाटात मजुरांना घेऊन जाणाऱ्या दोन ट्रक, एक आयशर व पुढे जाणारी कार यांच्यात सोमवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास झालेल्या विचित्र अपघातात सुमारे २६ प्रवासी जखमी झाले आहेत.मालेगावकडे जाणाºया मारुती सुझुकी कारचा (क्र. एमएच ०१ एएक्स ६९०३) वेग कमी झाल्याने मागून येणारा आयशर टेम्पो (क्र. एमएच १० झेड ३२९८) कारवर आदळला. त्यापाठोपाठ राजस्थानचा ट्रक (क्र. आरजे ११ जीए ४४७७) व दुसरा ट्रक (क्र. आरजे ०५ जीबी ०९०७) या दोन ट्रक आदळल्याने या अपघातातील सुमारे २६ प्रवाशी जखमी झाले.अपघातामुळे राहुड घाटात सुमारे दीड तास वाहतूक ठप्प झाली. चांदवड सोमा कंपनीचे कर्मचारी व पोलीस घटनास्थळी पोहचले व मदतकार्य सुरू केले. या अपघातात तीनही ट्रकमध्ये कारचा चेंदामेंदा झाला आहे. मुंबईहून उत्तर भारताच्या दिशेने मिळेल त्या वाहनाने नागरिक जात असताना राहुड घाटात हा अपघात झाला. पुढे जाणाºया कारचा गतिरोधक आल्याने अचानक वेग कमी झाल्याने या कारवर इतर दोन ट्रक जाऊन आदळल्या.--------------------जखमींची नावेअपघातात जखमी झालेल्यांची नावे- दीपाली माळी (२६), मीनाक्षी बच्छाव (२८), रमण रेवजी सोनवणे (७५), नंदू रमण सोनवणे (३०), वैष्णवी गोविंद माळी (५४), पूजा सागर कोळे (२५), सागर अप्पा माळी ( २३), रोशन दत्तात्रय बुटे (१८), सविता आशा रामनोर (२२), तर राजकुमार जैस्वाल (३५), मफनीया (गाजीपूर), निरमकुमार (२०), बरहड गाजीपूर, नियाम अहमद (२८), रसलपूर बाराबंकल, अरुणकुमार (२५), नकुलकुमार साहु (२३), अजय गुप्ता (२५) सासटा रजई, प्रतापगड, बिरेंद्रसिंग (४८) आग्रा, जाहीद अली (३२), हलोर बजार रायबरेली, जोया बानो (३५ वर्षे) रसलपूर बाराबंकल, बजरंग बहादुर गुप्ता (३७), भोलानाथ भारती (३२), नरहट्ट गाजीपूर, अनुजकुमार (२०), गडराम रायबरेली, सुरेशकुमार (४२), मजेगाव हटदोई (रायबरेली), लल्लु गुप्ता (५०), रजई ससरा प्रतापगड, रामप्रकाश (३५), सेवन सिवगड रायबरेली, पप्पू साहु (५०), इमहाबाद, प्रशांत क्षीरसागर (४३ ) आदी.
राहुड घाटात विचित्र अपघातात २६ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 9:42 PM