वणी : नाशिक - पेठ रस्त्यावरील रासेगाव शिवारात ट्रकला कार आडवी लावत चालकाला मारहाण करीत सुमारे २६ लाख रुपयांच्या ऐवजाची लूट करणाऱ्या चौघांविरोधात दिंडोरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना सोमवारी रात्री १ वाजेच्या सुमारास घडली.रासेगाव शिवारातून दहाचाकी ट्रक प्लॅस्टिकचे रोल घेऊन जात असताना ट्रकला कार आडवी लावत चालकाला मारहाण करून संशयित ट्रक घेऊन फरार झाले. अनिलकुमार भीमराव बॅनर्जी (३५, राहा. संगवळणी, ता.जि. बिदर, कर्नाटक) याने फिर्याद दिली. कारमधून चार चोरट्यांनी ट्रकचा पाठलाग केला. बॅनर्जी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिंडोरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळवण उपविभागात आठवडाभरात लुटीच्या तीन घटनाकळवण उपविभागाअंतर्गत येणाºया वणी, दिंडोरी व कळवण यांच्या कार्यक्षेत्रात जबरी लुटीच्या प्रत्येकी एक अशा तीन घटना घडल्या आहेत. वणी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या तिसगाव शिवारातील पेट्रोलपंपावर चार संशयितांनी कोयत्याचा धाक दाखवून कॅबिनच्या काचा फोडून जीवे मारण्याची धमकी देत १६ हजार पाचशे रु पयांची लूट केली होती. दुसºया घटनेत नांदुरी येथील पेट्रोलपंपावर रात्री ८ वाजता चार संशयितांनी अशाच पद्धतीने दहशत माजवून कोयत्याने हल्ला करत सुमारे दोन लाख रु पयांचे सुवर्णालंकार व ऐवजाची लूट केली होती. आता दिंडोरी पोलिसांच्या हद्दीतील उमराळे बुद्रुक दुरक्षेत्रातील रासेगाव शिवारात २६ लाख रु पयांच्या ऐवजाची लूट करण्यात आली आहे.नांदुरी पेट्रोलपंपावरील लुटीसंदर्भात मजुरांनी पाठलाग करून काही आरोपींना पकडले मात्र हाणामारीत एक संशयित मरण पावल्याने त्या मजुरांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला. एकापाठोपाठ एक घडलेल्या या घटनांमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ट्रकचालकाला मारहाण करत २६ लाखांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 8:49 PM