नाशिक : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दूध पुरवठा रोखण्याचा इशारा दिलेला असला तरी, आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यात सुमारे सव्वा लाख लिटर दूध संकलन करण्यात आले असून, २६ दूध टॅँकर पोलीस बंदोबस्तात मुंबईकडे रवाना करण्यात आल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. दूध संकलन केंद्रांना पोलीस बंदोबस्त हवा असेल तो देण्याची तयारी ठेवण्यात आली असून, त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्ह्णातील दूध संघ प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. जिल्ह्णात दरदिवशी १ लाख ३० हजार लिटर दुधाचे संकलन केले जाते त्यापैकी ५० हजार लिटर दुधाचा पुरवठा नाशिक शहरासाठी केला जातो व उर्वरित दूध मुंबईला पाठविले जाते. त्यापार्श्वभूमीवर दूध टॅँकर रवाना करण्यासाठी दूध संघांनी पोलीस यंत्रणेशी समन्वय साधावा तसेच दूध वाहतुकीचे वेळापत्रक प्रशासनाकडे दिल्यास या वाहनांना तत्काळ पोलीस संरक्षण उपलब्ध करून देण्यात येईल, असे सांगण्यात आले. आंदोलकांनी धमक्या अथवा आततायीपणा करण्याचा प्रयत्न केल्यास तत्काळ संबंधित पोलीस ठाण्यांना कळविण्यात यावे, मात्र कोणत्याही परिस्थितीत संकलन बंद करू नये, असे निर्देशही त्यांना देण्यात आले. नाशिक जिल्ह्णात सोमवारी सर्वच केंद्रांवर दूध संकलन नियमितपणे करण्यात आले असून, सायंकाळपर्यंत २६ टॅँकर रवाना करण्यात आल्याचे सांगण्यात आले. नाशिक व नगर जिल्ह्णात ४७ दूध संकलन केंद्रे असून, नगरचे दूधही नाशिकमार्गेच रवाना केले जाते याशिवाय जळगाव, धुळे जिल्ह्णातील दूधही नाशिकमार्गेच जात असल्याने त्या दृष्टीने पोलिसांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या बैठकीत दूध संकलन, वाहतूक, विविध दूध संघांकडून होणाºया दैनंदिन वाहतूक आदी बाबींचा आढावा घेण्यात आला. यावेळी पोलीस अधीक्षक संजय दराडे, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, दुग्धविकास अधिकारी श्रीकांत शिपूरकर आदी उपस्थित होते.नोडल अधिकारी नियुक्तीच्या सूचनाया आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याबरोबरच दूध संकलन संस्थांना पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून, त्यासाठी दूध संघांनी नोडल अधिकाºयांची नियुक्ती करावी, अशी सूचना त्यांना देण्यात आली आहे. आवश्यकता भासल्यास ०२५३-२३१७१५१ किंवा २३१५०८० या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पोलीस बंदोबस्तात २६ टॅँकर मुंबईला रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 1:24 AM