नाशिक - जलप्रदूषण रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाच्यावतीने अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर शहरात बाप्पांना पर्यावरणपूरक निरोप देण्यासाठी सहाही विभागांमध्ये कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली.एकूण २८कृत्रिम तलाव उभारण्यात आले आहेत. या कृत्रिम तलावांमध्ये भाविकांनी विधिवत गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन करून शहरातील नद्यांना प्रदूषणमुक्त ठेवण्यास हातभार लावल्याचे दिसून आले. दिवसभरात लाखो मूर्ती गणेशभक्तांनी कृत्रिम तलावात विसर्जित करून दान केल्या. मूर्ती, निर्माल्य संकलन अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद नाशिककरांनी दिला.
गणेशोत्सवाच्या सातव्या दिवसापासून शहरातील निश्चित करण्यात आलेल्या ठिकाणांवर कृत्रिम तलावांची उभारणी करण्यात आली आहे. यामुळे नाशिककरांनी सातव्या दिवशीदेखील कृत्रिम तलावात बाप्पांचे विसर्जन करावे तसेच निर्माल्य येथे असणाऱ्या ‘निर्माल्य संकलन वाहनात टाकावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सालाबादप्रमाणे यावर्षीदेखील बाप्पांच्या विसर्जन अधिकाधिक पर्यावरणपूरक पद्धतीने करण्यावर नाशिककरांनी भर द्यावा, असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले आहे.कृत्रिम तलावांची ठिकाणे
नाशिक पूर्वरामदास स्वामी मठ, आगर टाकळीशिवाजीवाडी पूलसाईनाथनगर चौफुली इंदिरानगरकलानगर चौक, रथचक्र सोसायटीराजीवनगर शारदा शाळानाशिक पश्चिमचोपडा लॉन्स पूल (गोदापार्क)चव्हाण कॉलनी (परीचा बाग)वनीकरण रोपवाटिकायेवलेकर मळाउंटवाडी रोड, म्हसोबा मंदिरमहात्मानगर पाण्याच्या टाकीजवळलायन्स क्लब उद्यान नवीन पंडित कॉलनीपंचवटी विभागपेठरोड आरटीओ कॉनरदत्त चौक गोरक्षनगर-कोणार्कनगरनाशिक रोडजेतवननगर जयभवानीरोडशाळा क्र .१२३ मैदानचेहेडी ट्रक टर्मिनसनारायण बापू चौक जेलरोड
सातपूर सोमेश्वर मंदिरशिवाजीनगरअशोकनगरपाइपलाइनरोड पेट्रोलपंपाशेजारी
नवीन नाशिक विभागडे केअर सेंटर शाळाजिजाऊ वाचनालय- २राजे संभाजी स्टेडियमपवननगर स्टेडियम‘अमोनियम बाय कार्बोनेट’ मोफतमहापालिका प्रशासनाच्या वतीने बाप्पांचे घरच्या घरी विसर्जन करण्यासाठी सहाही विभागीय कार्यालयांमधून भक्तांना अमोनियम बाय कॉर्बोनेट पावडर मोफत पुरविलीे. या पावडरचा अधिकाधिक वापर नागरिकांनी केला.