शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीनाथ मुंडे आज असते, तर अजित पवारांना भाजपसोबत घेतलं असतं का?; धनंजय मुंडे म्हणाले...
2
माझी लाडकी बहीण योजना बंद होण्याची चर्चा; अदिती तटकरेंनी केला खुलासा 
3
Bhagyashree Navtake IPS: १२०० कोटींचा घोटाळा, सीबीआयचा गुन्हा; कोण आहेत भाग्यश्री नवटके?
4
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी शिवसेनेत, जेलमधून परतताच पक्षप्रवेश
5
IND A vs Pak A : 'हायहोल्टेज' मॅच! युवा टीम इंडियानं दिला पाकिस्तान 'अ' संघाला दणका
6
Maharashtra Election 2024: नितीन गडकरींच्या घरी फडणवीस-बावनकुळेंचे 2 तास खलबते
7
IND vs PAK : कॅचेस विन मॅचेस! Ramandeep Singh च्या अफलातून कॅचनं फिरली मॅच (VIDEO)
8
Noel Tata: नोएल टाटांची पत्नी कोण? त्यांना कोणत्या गोष्टींची आहे आवड?
9
Navya Haridas: प्रियंका गांधींविरोधात भाजपाचा उमेदवार ठरला! नव्या हरिदास कोण?
10
राजेंद्र शिंगणेंच्या हाती तुतारी; पुतणीने शरद पवारांना विचारला खरमरीत सवाल!
11
‘वंचित’कडून विधानसभेसाठी आणखी १६ उमेदवारांची घोषणा; साताऱ्यातील २ जागांचा समावेश!
12
अखेर रणजीतसिंह मोहिते पाटलांचं ठरलं! आमदारकीचा राजीनामा; लवकरच पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
13
ठाकरेंना कोणत्या जागा हव्यात, ज्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा गाडा फसलाय?
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोहोळ, पंढरपूर अन् माढ्याचं गणित चुकल्यास पवारांचं राजकारण बिघडणार
15
Jharkhand Election 2024: भाजपाची पहिली यादी आली! झारखंडमधील ६६ उमेदवारांच्या नावाची घोषणा
16
वडील बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर झिशान सिद्दिकींची संतप्त पोस्ट; शायरीतून रोख कुणाकडे?
17
भाजप नेतृत्वाच्या मनात नेमकं काय?; फडणवीस-अजितदादा बाहेर, अमित शाह-CM शिंदेंची बंद दाराआड चर्चा!
18
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला की नाही? फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती
19
माढ्यात पवारांना धक्का बसणार? काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराने मराठा समाजाकडेच मागितली उमेदवारी
20
JMM-काँग्रेसमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोण किती जागांवर निवडणूक लढवणार? जाणून घ्या...

शहरात आज २९ कोरोनाबाधित; हॉटस्पॉट ठरलेल्या जुन्या नाशकात १७ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2020 10:16 PM

अमरधामरोडवरील एका धार्मिकस्थळाजवळ सहा महिन्याचा चिमुकलाही कोरोनाबाधित असल्याचे अहवालातून समोर आले.

ठळक मुद्देजुन्या नाशकात कोरोनाचा उद्रेक सुरूच आहेनाईकवाडीपुरा परिसर संपुर्ण ‘सील’ केला जाणार

नाशिक : शहरात कोरोनाचा कहर सुरू झाला असून सोमवारी (दि.८) नवे २८ रुग्ण महापालिका क्षेत्रात आढळून आले. त्यापैकी जुन्या नाशकात रात्री पावणेदहा वाजेपर्यंत १७ रुग्ण आढळून आले. शहराची कोरोनाबाधितांची संख्या आता सुमारे ४३६वर पोहचली आहे. जुन्या नाशकात कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे. दोन दिवसांत या भागात तब्बल ४१ रुग्ण आढळून आले आहे. मंगळवारी सकाळी जुन्या नाशकातील नाईकवाडीपुरा परिसर संपुर्ण ‘सील’ केला जाणार आहे.रविवारी (दि.७) रात्री साडेनऊ वाजेपर्यंत ६१ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले होते. जुने नाशिक परिसर शहराचा नवा हॉटस्पॉट बनला असून हा संपुर्ण परिसर तत्काळ महापालिकेने ‘कन्टेंन्मेंट झोन’ म्हणून ‘सील’ करण्याची मागणी आता होऊ लागली आहे. जुने नाशिकमधील नाईकवाडीपुरा भागात रविवारी १९ रुग्ण मिळून आले होते. यानंतर सोमवारी दिवसभरात बागवानपुरा भागात ६ तर कुंभारवाड्यात ४, नाईकवाडीपुरा-२, आझाद चौक (चव्हाटा)-१, अमरधाम रोड-२, खडकाळी-१, शिंगाडा तलाव-१ असे जुने नाशिक भागात सोमवारी आढळून आलेली रुग्णसंख्या आहे. अमरधामरोडवरील एका धार्मिकस्थळाजवळ सहा महिन्याचा चिमुकलाही कोरोनाबाधित असल्याचे अहवालातून समोर आले. जुन्या नाशकातील नाईकवाडीपुरा भागातील एका वृध्दाचा कोरोनाने बळी घेतला असून अद्याप अधिकृतपणे या भागातील दोन कोरोनाबाधित मृत्यूमुखी पडले आहे. शहरात कोरोनाने मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या आता २१ वर पोहचली आहे.

तसेच शहरातील रविवार पेठभागातदेखील सोमवारी कोरोनाने शिरकाव केला. या भागात सुध्दा एक रुग्ण मिळून आला. तसेच समतानगर-१, सिन्नरफाटा-१, महाराणाप्रतापनगर (पेठरोड)-१, पेठरोड-१, पंडितनगर (सिडको)-१, जेहान सर्कल-१, देवळाली-१ रु ग्ण आढळून आला.दिवसेंदिवस जुन्या नाशकातील रुग्णसंख्या वेगवेगळ्या भागात वाढू लागली आहे. महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधित रूग्णांचा आकडा अद्यापही कमी होत नसल्याने मनपा आरोग्य प्रशासनापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.एकीकडे लॉकडाऊन शिथिल केला जात असून राज्य शासनाच्या आदेशान्वये मनपा प्रशासन ‘मिशन बिगेन अगेन’ राबविण्याचा प्रयत्ना आहे, तर दुसरीकडे शहरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाणदेखील वाढत आहे. त्यामुळे आता महापालिका प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण होताना दिसत आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यू