नाशिक : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत घेण्यात येणाऱ्या पायाभूत चाचणीला मंगळवार (दि.२८)पासून सुरुवात झाली असून, परीक्षेच्या पहिल्या दिवशी दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी प्रथम भाषेचा पेपर दिला. जिल्ह्यातील राज्यमंडळाचा अभ्यासक्रम राबविणाºया सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमांच्या मान्यताप्राप्त शाळांमध्ये इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी २८ ते ३१ आॅगस्टदरम्यान ही पायाभूत चाचणी परीक्षा घेण्यात येत असून, जिल्हाभरातील विविध शाळांना या परीक्षांसाठी २८ लाख ३० हजार १०० प्रश्नपत्रिकांचे वाटप करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची भाषा, गणित, इंग्रजी, विज्ञान विषयांमधील गुणवत्ता सुधारण्याच्या उद्देशाने पायाभूत चाचणी दरवर्षी घेतली जाते. यंदाही दुसरीसाठी प्रथम भाषा व गणित या विषयांवर, तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांची प्रथम भाषा, गणित, तृतीय भाषा व इंग्रजी या विषयांवर व सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची प्रथम भाषा, गणित, विज्ञान व तृतीय भाषा इंग्रजी या विषयांसाठी परीक्षा होणार आहेत. इयत्ता दुसरी ते आठवीची प्रथम भाषा चाचणी मंगळवारी घेण्यात आली, तर गणित विषयाची चाचणी बुधवारी होणार आहे. तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची इंग्रजी विषयाची चाचणी गुरुवारी व सहावी ते आठवीच्या विद्याथ्यार्ची विज्ञानची चाचणी शुक्रवारी (दि.३१) होणार आहे. एक आठवड्याच्या कालावधीनंतर शाळांना पेपर तपासणी पूर्ण करणे बंधनकारक आहे.
पायाभूत चाचणीला २८ लाख प्रश्नपत्रिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 12:48 AM