शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

२८ लाखांचा मद्यसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 12:41 AM

दिंडोरीतील मद्यनिर्मिती कंपनीतून नांदेड जिल्ह्यासाठी पाठविलेल्या लाखो रुपये किमतीच्या मद्यसाठ्याचा परस्पर अपहार करणाºया ट्रकचालक-मालकासह आठ संशयितांना आडगाव पोलिसांनी अटक केली आहे़ या संशयितांकडून २८ लाख रुपयांचा मद्याचा साठा जप्त केला असून, संशयितांवर अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंचवटी : दिंडोरीतील मद्यनिर्मिती कंपनीतून नांदेड जिल्ह्यासाठी पाठविलेल्या लाखो रुपये किमतीच्या मद्यसाठ्याचा परस्पर अपहार करणाºया ट्रकचालक-मालकासह आठ संशयितांना आडगाव पोलिसांनी अटक केली आहे़ या संशयितांकडून २८ लाख रुपयांचा मद्याचा साठा जप्त केला असून, संशयितांवर अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लॉजिस्टीक ट्रान्सपोर्ट कंपनीचे मालक धर्मेंद्र मंडलोई यांच्या सांगण्यावरून आडगावमधील ओम ट्रान्सपोर्टचे चालक विजय कोठावले यांनी २७ जुलै रोजी दिंडोरीतील परनॉड रकार्ट इंडिया या मद्य कंपनीतून ट्रकचालक पोपट नाथा बागुल याचा मालट्रकमध्ये (एम. एच. १८, एम. २०२८) मध्ये ८४५ विदेशी दारूचे बॉक्स नांदेडला पाठविले़ यानंतर दोन दिवसांनंतर ट्रकचालक बागुल यास विचारणा केली असता नांदेड जवळील गोटूर येथे ट्रक नादुरुस्त झाल्याचे सांगितले़ कोठावले यांनी या ट्रकबाबत मंडलोई यांना कळविलेअसता संशय आल्याने मंडलोई हे खासगी वाहनाने गोटूरकडे निघाले व ट्रकची तपासणी केली असता ८४५ पैकी ३७६ बॉक्सचा अपहार झाल्याचे त्यांच्या लक्षात आले़ याप्रकरणी प्रथम मंठा पोलीस ठाण्यात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला, मात्र तो आडगाव हद्दीत घडल्याने नाशिक पोलिसांकडे वर्ग करण्यात आला होता़ आडगाव पोलिसांनी या सात संशयितांना अटक केली असून, संजय कांबळे हा फरार आहे़ ही कामगिरी पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आडगाव पोलीस निरीक्षक सुनीलकुमार पुजारी, सहायक पोलीस निरीक्षक काकासाहेब पाटील, मुशीर काझी, संजीव जाधव, दत्ता खुळे, वैभव परदेशी, वैभव खांडेकर, यशवंत गांगुर्डे, अनिल केदार यांनी केली़