शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार...
2
Satej Patil: सतेज पाटलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; "दुपारी २.३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला"
3
अटकेपार झेंडे फडकावले आमच्या मराठे शाहीने अन् इथे व्यासपीठावर मुली नाचवतायत? राज ठाकरे कुणावर संतापले?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी नॉट रिचेबल नव्हतो, सतेज पाटीलच..."; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर राजेश लाटकरांनी थेटच सांगितलं
5
कोलकाता बलात्कार प्रकरणी ८७ दिवसांनी आरोप निश्चित,दररोज सुनावणी होणार
6
धक्कादायक! मावशी गंगा स्नानाची रील बनवत राहिली अन् 4 वर्षांची चिमुकली बुडत रहिली! 2 तासांनंतर सापडला मृतदेह 
7
...तर रोहित कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होईल, केवळ एकदिवसीय सामने खेळेल; दिग्गज क्रिकेटरची मोठी भविष्यवाणी
8
कॅनडामध्ये हिंदू मंदिरावरावरील हल्ल्याचा मोदींकडून निषेध; 'ट्रुडोंनी कायद्याचे राज्य राखावे अशी अपेक्षा' 
9
AUS vs PAK : "ऑस्ट्रेलियाला नशिबाने साथ दिली...", पाकिस्तानच्या पराभवानंतर कर्णधार रिझवानचं विधान
10
सात राज्यांत कांटे की टक्कर, एकात ट्रम्प आघाडीवर; अमेरिकेच्या मतदानावर जगाच्या नजरा खिळल्या
11
video: लाईव्ह सामन्यादरम्यान कोसळली वीज; एका खेळाडूचा मृत्यू, तर अनेकजण गंभीर जखमी
12
त्याला १२ भाऊ आणि ४ बहिणी आहेत; पाकिस्तानी खेळाडूचा परिचय करुन देताना अक्रम भलतंच बोलला
13
दापोलीत सहा कदम, पर्वतीत तीन अश्विनी कदम! नावं, आडनावं 'सेम टू सेम', कुणाचा होणार 'गेम'
14
उपमुख्यमंत्री बनवून भाजपानं अन्याय केला का?; देवेंद्र फडणवीसांनी आभारच मानले, कारण...
15
राज ठाकरेंचा पहिला घणाघात; पक्ष फोडीवरून एकनाथ शिंदे-अजित पवारांवर बरसले
16
सदा सरवणकरांचा प्रचार करणार की अमित ठाकरेंचा? नारायण राणे म्हणाले...
17
"...तर मीही मुख्यमंत्री व्हायला तयार"; CM महायुतीचाच होणार म्हणत, रामदास आठवले बोलून गेले 'मन की बात'!
18
...तर उद्धव ठाकरे ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री झाले असते; देवेंद्र फडणवीसांनी मांडलं समीकरण
19
सतेज पाटील भडकण्यापूर्वी कोल्हापुरात मोठे नाट्य घडले, शाहू महाराजांनीच मधुरिमाराजेंना सहीचे आदेश दिले
20
Sanjay Roy : "मी निर्दोष आहे, मला फसवण्यात आलं"; आरोपी संजय रॉयने सरकारवर केला गंभीर आरोप

२२ मिनिटांत २८ लाखांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 1:49 AM

नाशिक-पुणे महामार्गावर शिवाजीनगर गुरुदेव अपार्टमेंटमधील रामभरोसे सुरक्षा व्यवस्था असलेल्या स्टेट बॅँक आॅफ इंडियाच्या एटीएम केंद्रातील मशीन गुरुवारी पहाटे दोघा चोरट्यांनी गॅस कटरच्या साह्याने कापून अवघ्या २२ मिनिटांत २८ लाखांची रोकड चोरून नेली. पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायरमध्ये आलेल्या पाच जणांच्या टोळीने ही चोरी केल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे.

ठळक मुद्देएटीएम फोडले : नाशिक-पुणे महामार्गावरील आयनॉक्ससमोरील घटना

नाशिकरोड : नाशिक-पुणे महामार्गावर शिवाजीनगर गुरुदेव अपार्टमेंटमधील रामभरोसे सुरक्षा व्यवस्था असलेल्या स्टेट बॅँक आॅफ इंडियाच्या एटीएम केंद्रातील मशीन गुरुवारी पहाटे दोघा चोरट्यांनी गॅस कटरच्या साह्याने कापून अवघ्या २२ मिनिटांत २८ लाखांची रोकड चोरून नेली. पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायरमध्ये आलेल्या पाच जणांच्या टोळीने ही चोरी केल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे.नाशिक-पुणे महामार्गावरील शिवाजीनगरलगतच कोपºयावरच गुरुदेव अपार्टमेंटमध्ये स्टेट बॅँकेचे एटीएम आहे. विशेष म्हणजे जवळच पोलीस उपायुक्तांचे कार्यालय आहे. असे असतानाही चोरट्यांनी सर्व साहित्यानिशी येऊन एटीएम फोडून लाखोंची रोकड चोरून नेली.या एटीएममध्येच मशीनच्या दर्शनी भागात कॅमेरा बसविण्यात आला आहे. सीसीटीव्ही कॅमेºयामध्ये कैद झालेल्या फुटेजनुसार गुरुवारी (१२ आॅक्टोबर) पहाटे ३.४४ च्या सुमारास निळ्या रंगाचा चौकटीचा शर्ट व मंकी कॅप परिधान करून अर्धवट तोंड झाकलेला चोरटा एटीएम केंद्रात आला आणि त्याने आतून लागलीच शटर लावून घेतले. त्यानंतर काही वेळाने पिवळा-राखाडी रंगाचा शर्ट व टोपी घातलेला दुसरा चोरटा एटीएम केंद्रात शिरला आणि त्यानंतर या दोघांनी गॅस कटरच्या साह्याने एटीएम मशीन (क्रमांक सीएफबीए ००७२३५०३३) पुढील भाग कापून मशीनमधील चार ट्रेमध्ये असलेली ५०० व १०० रुपये दराच्या नोटांची लाखो रुपयांची रोकड काढली.एटीएम मशीनच्या खालच्या बाजूचा पुढील भाग गॅस कटरने खाली बसून कापल्याने तो प्रकार कॅमेºयामध्ये कैद होऊ शकला नाही. मात्र गॅस कटर पेटविल्यानंतर पडलेला उजेड, मशीन कापताना निर्माण झालेला धूर कॅमेºयामध्ये स्पष्टपणे दिसत आहे. अवघ्या २२ मिनिटांत चोरट्यांनी एटीएम केंद्र फोडून लाखो रुपयांची चोरी करून पहाटे ४ वाजून ६ मिनिटांनी बाहेर पडले.दोघे चोरटे बाहेर उभ्या असलेल्या तीन सहकाºयांसह पांढºया रंगाची स्विफ्ट डिझायर (एमएच ०४ पूर्ण क्रमांक नाही) मधून शिवाजीनगर दत्तमंदिर, विजय-ममता चौफुली, वडाळारोडमार्गे भरधाव वेगात पळून गेल्याचे सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. चोरट्यांनी जाताना एटीएम केंद्राचे शटर लावून घेतले होते.इलेक्ट्रॉनिक पेमेंट अ‍ॅन्ड सर्व्हिसेस कंपनीकडून बॅँक एटीएम देखभाल, रोकड भरणे, एटीएम दुरुस्ती व मॉनिटरिंगचे काम केले जाते. संबंधित कंपनीचे अधिकारी मिलिंद काशीनाथ नेहे यांना गुरुवारी सकाळी ८.३० वाजता त्यांच्या मोबाइलमध्ये असलेल्या चॅनल मोबाइल पोर्टल या अ‍ॅपवर शिवाजीनगर स्टेट बॅँकेचे एटीएम डाउन असल्याचा मेसेज आला. नेहे यांनी एटीएम मशीनमध्ये रोकड भरणाºया एजन्सीचे आप्पा अहेर यांना फोन करून सदर एटीएमवर काय प्रॉब्लेम निर्माण झाला आहे ते बघण्यास सांगितले. त्यानुसार कर्मचारी अक्षय केलुस्कर हा सदर एटीएम केंद्राचे बंद शटर उचलून बघितले असता चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर एटीएम मशीनमध्ये रोकड जमा करणाºया कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांनी तत्काळ सदर घटनेची माहिती वरिष्ठ कार्यालयाला दिली. त्यानुसार तपासणी केल्यानंतर सदर एटीएममधून २८ लाख २२ हजार ५०० रुपये रकमेची चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. सदर घटनेची माहिती समजताच पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहायक पोलीस आयुक्त मोहन ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते व इतर विविध विभागांच्या पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत तपासाला सुरुवात केली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. —————————————————————जोड————————————————चार तासांपासून चोरट्याची टेहाळणीचोरी करणारे चोरटे हे त्या भागात सव्वाअकराच्या सुमारास आले होते. एटीएम केंद्राच्या अलीकडेच असलेल्या झाडाखाली स्विफ्ट डिझायर गाडी उभी करून चोरटे त्या ठिकाणी उभे असल्याचे तपासात पुढे आले आहे. त्यामध्ये चालकाने दाढी वाढवलेली असल्याचे बघणाºया युवकांने सांगितले. एटीएम केंद्राशेजारीच दुकानाजवळ चहा विक्रेता युवक रात्री ११.३० च्या सुमारास आपल्या घरच्यांची वाट बघत बसलेला होता. एका चोरट्याने त्या चहा विक्रेत्याला ‘इस जगह पर क्या कर रहे हो’ म्हणून विचारणादेखील केली. त्यानंतर चहाविक्रेत्यांचे नातेवाईक आल्यानंतर तो निघून गेला. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेºयाचे तपासलेले फुटेज व आजूबाजूच्या नागरिकांची चर्चा केल्यानंतर चोरटे चार तासापासून त्या ठिकाणी टेहाळणी करत असल्याचे समोर आले आहे.अ‍ॅक्सिसच्या एटीएममध्ये गेला होता चोरटास्टेट बॅँकेच्या एटीएम केंद्राशेजारीच असलेल्या अ‍ॅक्सिस बॅँकेच्या एटीएम केंद्रात पहाटे ३.२४ वाजता एक इसम गेल्याचे सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाले आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला असता तो इसम चोरट्याच्या टोळीतील असल्याचे उघडकीस आले आहे. चोरी करण्यापूर्वी टेहाळणी करीत असताना कोणी आल्यामुळे किंवा अ‍ॅक्सिस बॅँकेच्या एटीएममध्ये चोरी करता येऊ शकते का हे बघण्यासाठी चोरटा अ‍ॅक्सिसच्या एटीएममध्ये गेल्याचा संशय आहे. त्यानंतर २० मिनिटांनी स्टेट बॅँकेच्या एटीएममध्ये चोरीच्या प्रकाराला सुरुवात झाली.एटीएमची सुरक्षा रामभरोसेसदर एटीएम केंद्रात बॅँकेने कुठलाही सुरक्षारक्षक नेमलेला नसून ‘अलार्म’ सुविधादेखील लावलेली नाही. तसेच ई-सर्व्हेलन्स प्रणाली ज्यात एटीएम केंद्रातील मशीनसोबत कोणी छेडछाड केल्यास तसा संदेश मुंबई येथील सर्व्हेलन्स कार्यालयात आणि तेथून संबंधित बॅँकेत जातो. अशा प्रकारची ई सर्व्हेलन्स प्रणालीही सदर एटीएम केंद्रात बसविण्यात आलेली नाही. एकूणच स्टेट बॅँकेचे फोडलेले एटीएम केंद्राच्या सुरक्षेची काळजी रामभरोसे असल्याचे दिसून येते.दुसºयांदा यशस्वी चोरीयाच स्टेट बॅँकेच्या एटीएममध्ये १ सप्टेंबर २०१६ ते ३ सप्टेंबर २०१६ दुपारी ४.३० च्या दरम्यान चोरट्यांनी एटीएमचे मशीन गॅस कटरने पाठीमागून कापून ७ लाख ९० हजार ५०० रुपये चोरून नेले होते. बॅँकेला असलेल्या सुट्टीमुळे उशिरा चोरी उघडकीस आली होती. याप्रकरणी पोलिसांनी सात चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून केवळ १० हजार रुपये रोख हस्तगत केले होते.३८ लाख रुपये वाचलेएटीएम केंद्रात शेजारी शेजारी दोन मशीन्स आहेत. दोन्ही मशीनमध्ये ५० लाख रुपये ठेवण्याची क्षमता आहे. चोरट्यांनी एकच मशीन फोडून रोकड लंपास केली. त्यानंतर कर्मचाºयांनी न फोडलेले एटीएम मशीन उघडले असता त्यामध्ये ३८ लाख ५१ हजारांची रोकड सुरक्षित आढळली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीatmएटीएमtheftचोरी