नाशिक : राष्टÑपिता महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने शहरात ठिकठिकाणी महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. अभियानात २८ हजार ८१९ स्वयंसेवकांनी सहभागी होत सुमारे ३५२ टन कचरा उचलल्याची माहिती मनपाच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली. शालिमार चौकात सकाळी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत महास्वच्छता अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपस्थिताना स्वच्छताविषयक शपथ देण्यात आली. त्यानंतर पालकमंत्री गिरीश महाजन, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, आमदार बाळासाहेब सानप, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, विभागीय आयुक्त महेश झगडे, महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, आरोग्य समितीचे सभापती सतीश कुलकर्णी, सभागृहनेता दिनकर पाटील, महंत भक्तिचरणदास, प्रजापिता ब्रह्मकुमारी वासंतीदिदी यांनी हाती झाडू घेत परिसरात साफसफाई केली. मेनरोडवरील गाडगे महाराज पुतळ्यापर्यंत साफसफाई केल्यानंतर पालकमंत्री उंटवाडी तसेच संभाजी स्टेडियम येथे झालेल्या मोहिमेतही सहभागी झाले. यावेळी गिरीश महाजन यांनी सांगितले, नागरिकांनी पंधरवडा स्वच्छता अभियानाबरोबरच नियमित स्वच्छतेबाबतही जागरूक राहणे आवश्यक आहे असे सांगितले. दरम्यान, स्वच्छ भारत अभियानाचे ब्रॅण्ड अॅम्बेसिडर आंतरराष्टÑीय धावपटू कविता राऊत, चित्रकार सावंत बंधू, क्रीडा प्रशिक्षक अशोक दुधारे, छायाचित्रकार प्रसाद पवार यांचा सत्कार करण्यात आला. महापालिकेने ४५२ ब्लॅक स्पॉट निश्चित केले होते. मोहिमेत २८ हजार ८१९ स्वयंसेवकांनी सहभागी होत सुमारे ३५२ टन कचरा उचलल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागाने केला.११७ घंटागाड्या तैनातमहास्वच्छता अभियानासाठी महापालिकेने ११७ घंटागाड्या उपलब्ध करून दिल्या होत्या. शिवाय स्वयंसेवकांसाठी २५ हजार झाडू, ४० हजार मास्क व ४० हजार ग्लोज उपलब्ध करून दिले होते. कचरा वाहून नेण्यासाठी घंटागाड्यांव्यतिरिक्त ३३ जेसीबी, ४१ डंपर व ३० ट्रॅक्टर तैनात करण्यात आले होते.जिल्हाधिकाºयांनी वेधले लक्षस्वच्छता मोहिमेत विभागीय आयुक्त महेश झगडे, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, मनपा आयुक्त अभिषेक कृष्ण, पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांनीही सहभाग नोंदवला. परंतु मोहिमेत सर्वाधिक लक्ष वेधले ते जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी. जिल्हाधिकाºयांनी काही नागरिकांच्या सोबतीने दोन-तीन ब्लॅक स्पॉट्स स्वच्छ केले.१४२ शाळांचा सहभाग४शहरातील सहाही विभागांतील १४२ शाळांमधील १९ हजार ७४१ विद्यार्थी सहभागी झाले होते. शिवाय, १९४ स्वयंसेवी संस्थांनीही सहभाग नोंदविला. महापालिकेचे ३१५५ कर्मचारी आणि ५९२३ नागरिकही या मोहिमेत सहभागी झाले होते. सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत सदर मोहीम राबविण्यात आली.
28,819 स्वयंसेवक; 352 टन कचरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 12:37 AM