शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बोनस मंजूर, मिळणार 'इतकी' रक्कम! 
3
"आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस’’, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
4
अखेर सापडलं सोन्याचं घुबड, ३१ वर्षांपासून शोघ घेत होता संपूर्ण देश, नेमकं कारण काय?  
5
धक्कादायक! घरात घुसून पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची हत्या; CM योगींनी दिले कारवाईचे आदेश
6
केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा
7
एक दोन नव्हे, तब्बल 7 आघाड्यांवर युद्ध लढतोय चिमुकला इस्रायल; जाणून घ्या, ज्यूंचे शत्रू कोण कोण?
8
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
9
Sangli: शरद पवारांच्या दौऱ्याने सांगलीत भाजपला मोठा धक्का; राजेंद्रअण्णा देशमुख पवार गटात
10
वैवाहिक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
11
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
12
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
13
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
14
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
15
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
17
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार
18
"त्याचा लहान भाऊ म्हणून...", छोटा पुढारीने सूरज चव्हाणबाबतीत दिला मोठा शब्द
19
Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते विधानसभेच्या रिंगणात, आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढणार!
20
महाराष्ट्रातील क्रीडारत्नांचा सन्मान! अविनाश साबळेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, प्रदीप गंधेंना 'जीवन गौरव'

बारा तासांत नाशकात ३८ रुग्ण : कोरोनाबाधितांचा आकडा ५५९ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2020 2:13 PM

एकूणच जिल्ह्यातील मालेगावमध्ये कोरोनाचा कहर सुरू असून नाशिक शहरातही विविध उपनगरांमध्ये आता कोरोनाचा प्रादूर्भाव वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी लॉकडाउनचे सर्व नियमांचे पालन करणे अत्यावश्यक

ठळक मुद्देअवघ्या दोन वर्षाच्या बालिकेचाही समावेश आहेपुर्णपणे बरे झालेले रुग्ण ४६दिंडोरी तालुक्यात कोरोनाचा शिरकाव

नाशिक : शहरासह जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून गुरूवारी (दि.७) जिल्ह्यात रात्री साडेनऊ वाजेपर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा ५२१ इतका होता; मात्र शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता हा आकडा थेट ५५९ पर्यंत जाऊन पोहचला. यामध्ये शहरासह मालेगाव आणि दिंडोरी तालुक्यातदेखील कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने आता नाशिककरांची चिंता कमालीची वाढली आहे. शुक्रवारी सकाळपर्यंत प्रलंबित ६०० नमुन्यांपैकी ४२० अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये ३८० निगेटिव्ह तर एकूण ३८ पॉझिटिव्ह रुग्ण नव्याने आढळून आले.मालेगावमध्ये कालपर्यंत ४२० रुग्ण होते; मात्र सकाळी ही संख्या ४४१ वर पोहचली म्हणजेच २१ नवे रुग्ण मालेगावमध्ये आढळून आले. यामध्ये दीड वर्षाच्या चिमुकल्याचाही समावेश आहे. तसेच नाशिक शहराचा कोरोनाबाधितांचा आकडा आता ३९ वर पोहचला आहे. शुक्रवारी सकाळी नाशिक महापालिका क्षेत्रात १३ नवे रुग्ण आढळले. यामध्ये सातपूरला अवघ्या दोन वर्षाच्या बालिकेचाही समावेश आहे.एकूणच जिल्ह्यातील मालेगावमध्ये कोरोनाचा कहर सुरू असून नाशिक शहरातही विविध उपनगरांमध्ये आता कोरोनाचा प्रादूर्भाव वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी लॉकडाउनचे सर्व नियमांचे पालन करणे अत्यावश्यक असून गरजेपुरतेच बाहेर पडावे, तेदेखील योग्य ती काळजी घेऊनच असे आवाहन जिल्हा व आरोग्य प्रशासनाबरोबरच पोलीस प्रशासनाकडूनही केले जात आहे; मात्र नागरिकांमध्ये त्याचे कुठलेही गांभीर्य दिसून येत नसल्याने मोठे आश्चर्य व्यक्त होत आहे.नाशिक जिल्हा प्रशासनाने बुधवारपासून शहरातील जवळपास सर्वच दुकाने खुली करण्याची मुभा दिली आहे. अर्थचक्र गतिमान करण्यासाठी प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला असला तरीदेखील त्याचा गैरफायदाच अधिक घेतला जात असल्याचे दिवसभराच्या चित्रावरून दिसून आले. तसेच आता दुकाने खुली ठेवण्याची वेळ देखील सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत करण्यात आली आहे. गुरूवारी शहरातील बाजारपेठांमधील काही भागात नागरिकांनी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेच्या दरम्यान चांगलीच गर्दी केली होती असेच चित्र शुक्रवारीसुध्दा पहावयास मिळाले. शुक्रवारी वाइन शॉपदेखील खुले केले गेले. यामुळे वाइन खरेदीसाठीही मद्यपी घराबाहेर पडले; मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने आखलेल्या नियोजनामुळे शहरात काही अपवाद वगळता फारसा गोंधळ सोमवारप्रमाणे वाइनशॉपच्या बाहेर पहावयास मिळाला नाही.महिन्याचा पहिला आठवडा पूर्ण होत असल्याने किराणा दुकानांवरदेखील आता महिन्याचा किराणा भरण्यासाठी रांगा नजरेस पडू लागल्या आहेत. शुक्रवारी प्राप्त अहवालानुसार शहरात महापालिका क्षेत्रात सातपूर कॉलनीमध्ये आठ तर पाथर्डीफाटा, पाटीलनगर, नवीन सिडको, श्रीकृष्णनगर, पंचवटीतील हिरावाडी या भागात प्रत्येकी एक असे एकूण १३ नवीन कोरोनाबाधित रुग्णांचा नमुना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला.तसेच ग्रामिण भागातदेखील कोरोनाचा प्रादूर्भाव आता वाढताना दिसत आहे. जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात अद्याप कोरोनाने शिरकाव केलेला नव्हता; मात्र आज सकाळी दिंडोरीतदेखील एक रूग्ण आढळून आला आहे. तसेच विंचूर गावात दोन कोरोनाबाधित आढळले.कोरोना अपडेट्सपॉझिटिव्ह रूग्णसंख्या अशी...नाशिक ग्रामिण - ६०नाशिक मनपा - ३९मालेगाव मनपा - ४४१जिल्हा बाहेरील - १९पुर्णपणे बरे झालेले रुग्ण ४६कोरोणाग्रस्त एकूण १९ रुग्णांचा बळी (मालेगावमधील १८)रूग्णालयात उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रूग्ण एकूण ४९४अद्याप १८० कोरोना नमुना चाचणी अहवालांची प्रतीक्षा कायम 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयMalegaonमालेगांव