नाशिक : शहर व परिसरात दुचाकी, चारचाकी वाहन चोरीचे सत्र अद्यापही सुरूच आहे. नव्या वर्षात पोलिसांपुढे घरफोडी, सोनसाखळी चोरी, वाहनचोरीसारखे लहान-मोठे गुन्हे नियंत्रणात आणण्याचे आव्हान उभे राहिले आहे. २०१९ सालात नाशिककरांची तब्बल ४८० वाहने अज्ञात चोरट्यांनी गायब केली. मागील वर्षाच्या तुलनेत ८९ वाहने कमी चोरीला गेली असली तरी वाहनचोरीचे गुन्हेदेखील फारसे उघडकीस आलेले नाही. वर्षभरात केवळ १०२ वाहनचोरीच्या गुन्ह्यांची उकल पोलिसांना करता आली आहे.शहरातील सार्वजनिक ठिकाणी उभ्या केलेल्या वाहनांवर चोरट्यांचा डोळा कायम आहे. वाहनचोरी करणाऱ्यांची टोळी शहरात सक्रिय आहे. सार्वजनिक ठिकाणांहून वाहने गायब करण्याबरोबरच राहत्या घरांच्या वाहनतळांमधूनसुद्धा वाहने चोरून नेण्यापर्यंत चोरट्यांची मजल पोहोचली आहे. २०१८ साली ५६९ लहान-मोठी वाहने चोरट्यांनी गायब केली होती. त्यापैकी १५५ वाहनचोरीचे गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले होते. २०१९ मध्ये चोरट्यांनी ४८० वाहनांवर डल्ला मारला. त्यापैकी केवळ १०२ वाहनचोरीचे गुन्हे उघड करता आले. त्यामुळे वाहनचोरीच्या गुन्ह्यांच्या उकलची टक्केवारी केवळ २१ राहिली. २०१८ साली २७ टक्क्यांपर्यंत वाहनचोरीचे गुन्ह्ये उकलचे प्रमाण होते.मोटारचोरीच्या गुन्ह्यांत १६ टक्क्यांनी घट झाल्याचा दावा पोलीस आयुक्तालयाकडून एकीकडे केला जात असला तरी दुसरीकडे गुन्ह्यांच्या उकलचे प्रमाणही घटल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. नाशिककरांची वाहने राहत्या घरापासून सार्वजनिक ठिकाणांपर्यंत सुरक्षित नसल्याने संताप व्यक्त होत आहे. वाहनचोरीच्या वाढत्या घटनांमुळे नाशिककर आश्चर्यचकित झाले आहे. वाहनांच्या सुरक्षेबरोबरच बंद घरांच्या सुरक्षेचाही प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. बुधवारी (दि.१) पेठरोडवरून ओमाराम रामाराम पटेल (३२) यांची अल्टो कार (एम.एच.१५ एएस २२७६) अज्ञात चोरट्यांनी एका रुग्णलायापासून पळवून नेली. काठेगल्लीमधील पाटीदार भवनाजवळ असलेल्या हिमको सोसायटीच्या वाहनतळातून दुचाकी (एम.एच.१५ बी.आर. २८३५) चोरट्यांनी पळवून नेली. तसेच तीन ते चार दिवसांपूर्वी दत्ता लक्ष्मण नाटकर (६०) या ज्येष्ठाच्या मालकीची रिक्षा (एम.एच.१५ ई.एच. ३४९०) अज्ञात चोरट्यांनी पंचवटी कारंजा परिसरातील येवलेकर चाळीतील त्यांच्या राहत्या घरासमोरून चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला.अजब फंडा : महिलांना मदतीचा बहाणामहिलांना मदत करण्याच्या बहाण्याने सार्वजनिक ठिकाणी काही चोरट्यांनी वाहनांची किल्ली घेत त्यांच्या डोळ्यांदेखत दुचाकी पळवून नेल्याच्याही घटना घडल्या आहेत. महिलांना दुचाकीला किक मारता येत नाही किंवा दुचाकी अचानकपणे नादुरुस्त झालीच तर चोरट्यांनी त्याचा गैरफायदा घेत वाहने लंपास केली आहेत.वर्दळीच्या ठिकाणांसह घराजवळूनही वाहने लंपासचोरट्यांनी वर्षभरात केवळ सार्वजनिक ठिकाणांवरून दुचाकी, चारचाकी वाहने लंपास केली असे नाही, तर याबरोबरच नागरिकांनी दारापुढे उभी केलेली वाहनेही चोरट्यांनी लांबविल्याच्या घटना घडल्या आहेत. सोसायट्यांच्या वाहनतळात उभ्या असलेल्या दुचाकी चोरट्यांनी हातोहात गायब केल्याचे उघडकीस आले आहे. दुचाकीचोरीचा सिलसिला नव्या वर्षात नियंत्रणात येईल का? असा सवाल नाशिककरांकडून उपस्थित होत आहे. थेट सर्रासपणे बनावट किल्ल्यांचा वापर करच वाहनांची चोरी केली जात असल्याचे पोलिसांच्या तपासातून पुढे आले आहे.
वर्षभरात ४८० वाहने गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2020 12:50 AM
नाशिक शहर व परिसरात दुचाकी, चारचाकी वाहन चोरीचे सत्र अद्यापही सुरूच आहे. नव्या वर्षात पोलिसांपुढे घरफोडी, सोनसाखळी चोरी, वाहनचोरीसारखे लहान-मोठे गुन्हे नियंत्रणात आणण्याचे आव्हान उभे राहिले आहे. २०१९ सालात नाशिककरांची तब्बल ४८० वाहने अज्ञात चोरट्यांनी गायब केली. मागील वर्षाच्या तुलनेत ८९ वाहने कमी चोरीला गेली असली तरी वाहनचोरीचे गुन्हेदेखील फारसे उघडकीस आलेले नाही. वर्षभरात केवळ १०२ वाहनचोरीच्या गुन्ह्यांची उकल पोलिसांना करता आली आहे.
ठळक मुद्देदुचाकींची सर्वाधिक चोरी : गुन्ह्यांच्या प्रमाणात किंचित घट; १०२ गुन्ह्यांची उकल शक्य