नाशिक : शहर गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाला पुन्हा दुचाकी चोरीचा उलगडा करण्यास यश आले आहे. दिंडोरी तालुक्यातील एका चोरट्याला बेड्या ठोकल्यानंतर त्याच्याकडून तब्बल ४ लाख ६० हजार रुपये किमतीच्या एकूण १३ दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या. शहरातील एक तर ग्रामीण भागातील ११ गुन्हे उघडकीस आले आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुन्हे शाखा युनिट-१चे हवालदार येवाजी महाले शहर व ग्रामीण भागातील दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करत असताना गस्तीदरम्यान त्यांना एका गुप्त बातमीदाराकडून संशयित चोरटा नितीन झोमन हा त्याच्या दिंडोरी तालुक्यातील कुरनवली येथील राहत्या घरी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार महाले यांनी याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांना माहिती दिली. वाघ यांनी तत्काळ उपनिरीक्षक बलराम पालकर यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करून त्याच्या मूळ गावात सापळा रचला. रात्रीच्या सुमारास संशयित नितीन हा एका दुचाकीवर त्याच्या घरी आला. पथकाने त्यास तत्काळ ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यात असलेली होंडा शाईन दुचाकीबाबत (एम.एच. १५ इजे ३०१८) पोलिसांनी चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र त्यास ताब्यात घेण्यात आले.खाकीचा हिसका दाखविल्यानंतर संशयित नितीन याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने दुचाकी चोरी केल्याची कबुलीही दिली. नितीन हा अट्टल दुचाकी चोरटा असल्याचे लक्षात आले. तो त्याच्या एका साथीदाराच्या मदतीने चोरी करत असल्याचे निष्पन्न झाले.या दुचाकी जप्तनितीनकडून स्प्लेंडर-४, होंडा शाईन-८, ड्रीमयूगा-१ अशा १३ दुचाकी जप्त करण्यास पोलिसांना यश आले आहे. या चोरट्याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने जिल्ह्यातील काही तालुक्यांसह थेट गुजरातमधील दोन जिल्ह्यांमधूनदेखील दुचाकी चोरी केल्याचे उघड झाले आहे.
चोरट्याकडून १३ दुचाकी हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 1:08 AM
शहर गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाला पुन्हा दुचाकी चोरीचा उलगडा करण्यास यश आले आहे. दिंडोरी तालुक्यातील एका चोरट्याला बेड्या ठोकल्यानंतर त्याच्याकडून तब्बल ४ लाख ६० हजार रुपये किमतीच्या एकूण १३ दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या.
ठळक मुद्देगुन्हे शाखा : गुजरातमधील तीन मोटारसायकलींचा समावेश