इंदिरानगर : महापालिकेच्या पूर्व विभागीय कार्यालयाच्या वतीने एका दिवसात २९ लाख १९ हजार रुपये घरपट्टी थकबाकी मिळकतधारकांकडून आणि १ लाख ७१ हजार रुपये थकबाकी मिळकतधारकांची पाणीपट्टी वसूल करण्यात आली आहे; तसेच ६८ थकबाकीदारांचे नळ जोडण्यात आले आहेत. महापालिकेच्या पूर्व विभागात घरपट्टीचे ८७ हजार ४५८ मिळकतधारक आहेत; तसेच २९ हजार ७०६ नळजोडण्या आहेत. त्यात निवासी नळजोडण्या २८ हजार २०६, व्यावसायिक नळजोडण्या १०६४ व अनिवासी नळजोडण्या ४३६ अशी संख्या आहे. महापालिका प्रशासक कैलास जाधव व उपायुक्त अर्चना तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी (दि. १८) विभागीय अधिकारी स्वप्निल मुधलवाडकर यांनी थकबाकीदारांविरुद्ध धडक मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार २९ लाख १९ हजार रुपये थकबाकी घरपट्टी मिळकतधारकांकडून आणि १ लाख ७१ रुपये थकबाकी नळपट्टी मिळकतधारकांकडून वसूल करण्यात आली आहे; तसेच ६८ नळपट्टी थकबाकी मिळकतधारकांची नळजोडणी तात्पुरत्या स्वरूपात तोडण्यात आली आहे. दहा हजार रुपयांच्या वर नळपट्टी थकबाकी मिळकतधारकांची नळजोडणी तात्पुरत्या स्वरूपात तोडण्यात येत आहे. तसेच थकबाकीची रक्कम न भरता परस्पर नळजोडणी करणाऱ्या मिळकतधारकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. सध्या दहा हजार रुपयांच्या वर थकबाकी मिळकतधारकांना जप्ती वॉरंट काढण्यात येत आहे.
महापालिकेच्या तिजोरीत एका दिवसात ३० लाखांचा महसूल जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2022 1:10 AM