शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

पेठ तालुक्यात सुगंधी तंबाखूसह ३० लाखांचा मुद्देमाल पकडला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2021 12:03 AM

पेठ : एकीकडे कोरोनाचे संकट गडद होत असताना गुटखा व तत्सम तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांनी उच्छाद मांडला असून, पेठ तालुक्यातील वांगणी शिवारात जवळपास ३० लाख रुपये किमतीचा पानमसाला, सुगंधी तंबाखू, आदी मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे३० लक्ष २९ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

पेठ : एकीकडे कोरोनाचे संकट गडद होत असताना गुटखा व तत्सम तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांनी उच्छाद मांडला असून, पेठ तालुक्यातील वांगणी शिवारात जवळपास ३० लाख रुपये किमतीचा पानमसाला, सुगंधी तंबाखू, आदी मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.याबाबत पेठ पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वांगणी गावाजवळ सोमवारी (दि. ५) धरमपूर-पेठ राष्ट्रीय महामार्गावर वांगणी शिवारात स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सहायक पोलीस निरीक्षक अनिल वाघ, पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील, हवालदार तूपलोंढे, वसंत खांडवी, आदींनी गुजरातकडून येणाऱ्या संशयित वाहनाची (एमएच १२ एसएफ ८०१०) तपासणी केली असता त्यात प्लास्टिक कॅरेटच्या आड तब्बल २० लाखांचा प्रतिबंधित केशरयुक्त पानमसाला व सुगंधी तंबाखू हस्तगत करण्यात आला आहे.या वाहनात केशरयुक्त विमल पानमसाला व व्ही-१ सुगंधी तंबाखू असा एकूण किंमत २० लक्ष २९ हजार ७२० रुपयांचा माल व १० लाख किमतीचे वाहन असा ३० लक्ष २९ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.अन्नसुरक्षा अधिकारी संदीप देवरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पेठ पोलिसांत वाहनचालक नारायणदास देवास (रा . धानोरी पुणे) , जितूराम गमणाराम माळी (रा. धानोरी, पुणे) यांनी सदरचा माल नानापोडा येथील पुनजीशेठ (पूर्ण नाव माहीत नाही.) यांच्याकडून घेऊन मुकेशभाई महाराज येरवडा (रा. पुणे) चेतनसिंग राजपुरोहित, चेनारम देवास येरवडा (रा. पुणे) यांच्यासाठी वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती दिली. पेठ पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुद्देमालासह संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप वसावे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPolice Stationपोलीस ठाणे