नाशिक : शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतून मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, एप्रिलमध्ये ३० मुली बेपत्ता झाल्याची फिर्याद पालकांनी दिली. मुली बेपत्ता होण्याची सर्वाधिक संख्या ही अंबड व सिडको व इंदिरानगर परिसरांतील असून, प्रतिदिन एक मुलगी बेपत्ता होत असल्याचे दिसून येते़ शहरातील बहुतांशी शाळांच्या परीक्षा आटोपल्या असून, सुट्या लागल्या आहेत. पदवी व पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत़ बेपत्ता होण्यामध्ये शाळकरी विद्यार्थिनींचे संख्या अधिक असल्याने पालक चिंतित आहेत़मुलींच्या पलायनानंतर बहुतांशी पालक हे सामाजिक भीतीपोटी पोलिसांत फिर्याद देत नाहीत. फिर्याद दिली तरी पूर्ण माहिती देत नाहीत़ त्यामुळे मुलींचा शोध घेण्यास पोलिसांना अडचण येत आहे. पालकांचा पाल्यांसोबतचा संवाद हरपत चालला आहे़आई-वडील दोघेही नोकरीला, मुला-मुलींकडे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून दिलेल्या मोबाइलमधून सोशल मीडियाचा वाढलेला वापर यामुळे पालकांचा मुलांसोबतचा संवाद कमी होत चालला आहे. पालकांनी पाल्य, त्यांचे मित्र-मैत्रिणी, शिक्षक यांच्यासोबत संवाद वाढविण्याची आवश्यकता आहे़- डॉ़ जयंत ढाके, मानसोपचार तज्ज्ञमुली बेपत्ता होण्यामागे विविध कारणे असून पालकांनी मुलींसोबतचा संवाद वाढविणे गरजेचे आहे़ बेपत्ता मुलींच्या तक्रारीबाबत गांभीर्याने तपास करून तिचा शोध घेतला जातो़- डॉ़ रवींद्रकुमार सिंगल,पोलीस आयुक्त
नाशिकमधून एप्रिलमध्ये ३० मुली बेपत्ता!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2018 6:16 AM