कळवण : तालुक्यात ३० कोरोना पॉझिटिव्ह रु ग्ण आढळून आल्याने चिंता कायम आहे. कळवण, मानूर, आठबे, अभोणा, भगुर्डी, नवीबेज, नाकोडा येथील नव्या रु ग्णाचा त्यात समावेश आहे. तालुक्यात आजमितीस ४७ रु ग्ण आहे.लॉकडाऊन च्या काळात कळवण कोरोनापासून सुरिक्षत राहिले. मात्र एक रूग्ण पॉझिटीव्ह आल्याने चित्र पालटलं. आज तालुक्यात नवे ३० पॉझिटिव्ह रु ग्ण आढळून आल्यामुळे प्रशासन गंभीर झाले आहे. तालुक्यात आतापर्यंत १२० रु ग्ण आढळून आले असून ५ जणांना मात्र जीव गमवावा लागला आहे. अगदी किरकोळ कामासाठीही कळवण आणि तालुक्यातील नागरिक गर्दी करतांना मास्कचा वापर टाळत असल्याचे चित्र कळवणला बघायला मिळते. एकाच दिवशी तालुक्यात कोरोनाचे 30 पॉझिटिव्ह रूग्ण आढळल्याने प्रशासनाने आता अधिक सतर्क होवून सवलतींवर निर्बंध घालत पुन्हा कडक धोरण अवलंबवण्याची गरज व्यक्त आहे. शासन आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.