शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
6
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
7
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
8
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
9
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
10
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
11
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
12
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
13
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
14
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
15
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
16
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
17
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
18
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
19
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
20
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप

महिनाभरात तब्बल ३० पटीने वाढ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 4:15 AM

नाशिक : मार्च महिन्याच्या प्रारंभी अर्थात १ मार्चला बाधित संख्या अवघी १४० तर २४ मार्चला बाधित संख्येत ३० पट ...

नाशिक : मार्च महिन्याच्या प्रारंभी अर्थात १ मार्चला बाधित संख्या अवघी १४० तर २४ मार्चला बाधित संख्येत ३० पट वाढ होऊन ३३३८ वर पोहोचली आहे. कोरोनाने सर्वाधिक कहर गत ८ दिवसांत गाठला असून, या आठ दिवसांमध्ये कोरोनाचे तब्बल २० हजार ५७९ रुग्ण बाधित झाले आहेत.

मार्च महिन्यात कोरोनाने अक्षरश: विस्फोट घडवलेला असून कोरोना प्रसाराचा वेग कल्पनेच्या पलीकडे असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा केवळ दर्शक झाल्यासारखे चित्र आहे. कोरोना प्रसाराच्या वेगात आठवड्या-आठवड्यात होणारी वाढ ही संपूर्ण यंत्रणेला चक्रावून सोडणारी आहे.

इन्फो

१७ मार्चला ओलांडला दोन हजारांचा टप्पा

गत आठवड्यात बुधवारी प्रथमच कोरोनाबाधितांच्या आकड्याने दोन हजारांचा टप्पा ओलांडला होता. त्याआधीच्या आठवड्यात बाधितांचा आकडा हजार ते दीड हजार होता. तर त्यापूर्वीच्या आठवड्यात हा आकडा पाचशे ते सहाशेदरम्यान होता. अवघ्या दोन आठवड्यात कोरोनाने वाढीचा महाभयानक वेग गाठला आहे. गत बुधवारी २१४६ पर्यंत मजल गाठल्यानंतर गुरुवारी २४२१ पर्यंत बाधितांच्या आकड्याने मजल मारली होती. तर शुक्रवारी त्यापेक्षाही अधिक म्हणजे २५०८ बाधित, शनिवारी २३८३ बाधित, रविवारी २३६०, सोमवारी २७७९ तर मंगळवारी २६४४ रुग्ण बाधित आढळून आले होते. या वेगाने जिल्ह्याची वाटचाल अत्यंत भयप्रद दिशेने सुरू झाल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

इन्फो

मार्च महिन्यात तब्बल ५ टप्पे

मार्च महिन्याच्या अवघ्या चार आठवड्यात कोरोनाने त्याच्या विस्फोटाचे ५ टप्पे दाखवले आहेत. महिन्याच्या प्रारंभी १ मार्चला कोरोनाचे अवघे १४० बाधित तर तर आठवड्याच्या अखेरीस त्यात चौपट वाढ होऊन ७ मार्चला ५६३ बाधित रुग्ण होते. दुसऱ्या आठवड्यात १४ मार्चला बाधित संख्या १३५६ वर पोहोचली तर २१ मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात हा आकडा २३६० असा अनेक पटीत वाढत गेला आहे. त्यानंतर अवघ्या तीन दिवसात २४ मार्चला बाधितांच्या आकड्याने ३ हजारांचा आकडा ओलांडून ३३३८ पर्यंत पोहोचल्याने कोरोनाने महिन्याच्या प्रारंभापासून आतापर्यंत तब्बल ५ टप्पे गाठले आहेत.

--------------

या स्टोरीला ग्राफ घ्यायचा आहे. सपकाळे साहेबांकडून.