नाशिक : तब्बल तीस वर्षांची बालमैत्री... शाळेतील आठवणींना उजाळा... एकमेकांविषयी आतुरता अन् विचारपूस या सर्व भावनांना मेळाव्याच्या माध्यमातून वाट करून देण्यात आली. वणी येथील कर्मवीर रावसाहेब थोरात हायस्कूलच्या शाळेच्या १९८६ सालच्या बॅचचा मेळावा नुकताच नाशिकमध्ये आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात अनेकांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. विल्होळी येथील एका रिसॉर्टमध्ये हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यासाठी मुंबई, नगर, वणी, पुणे, नाशिक या ठिकाणांहून सदस्य उपस्थित होते. वणी येथील बंटी सय्यद, किरण सोमवंशी, हेमंत थोरात, राजेंद्र थोरात, विनोद देशमुख, बाळू गायकवाड, दीपक पारख, संजय पलोड तसेच मातुलठाण येथील माजी सरपंच कैलास कणसेपाटील, तर मुलींमध्ये मुंबईहून भावना जाधव, उज्ज्वला राजपूत, सीमा सोमवंशी, कविता गांगुर्डे, मंगल पानपाटील, सुनीता थोरात आदि उपस्थित होते. यावेळी सर्वांनी धम्माल, मस्ती, गीतगायन, नृत्य केले. या कार्यक्रमासाठी विजय बच्छाव यांनी परिश्रम घेतले. दरवर्षी अशा प्रकारचा मेळावा आयोजित करण्याचे आवाहन सदस्यांनी यावेळी केले. (वार्ताहर)
३० वर्षांच्या मैत्रीला मिळाला उजाळा
By admin | Published: January 22, 2017 11:06 PM