नाशिक:पुणे विद्यार्थी गृहाच्या महाराष्ट्र विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी तीन दशकांनंतर एकत्र येऊन तत्कालीन शिक्षक व सेवक वृंद यांसह पुन्हा शाळा भरविली. आधी शाळेची घंटा वाजवून नंतर प्रार्थना,राष्ट्रगीत व प्रतिज्ञा घेण्यात आली.यानिमित्त भरलेल्या स्रेहसंमेलनात विविध स्पर्धा घेण्यात आल्या. क्रि केट, तीन पायांची शर्यत,चमचा लिंबू,संगीत खुर्ची इत्यादी खेळ खेळून बालपणीच्या आठवणींना या विद्यार्थ्यांनी उजाळा दिला. प्रमुख अतिथी म्हणून आमदार राहुल ढिकले उपस्थित होते. त्यांनीही शालेय जीवनातील आठवणी सांगितल्या.विविध स्पर्धांमधील विजेते बबन ढगे, अधिकराव केदार, भाऊसाहेब बोडके, नामदेव निश्चित ,संदीप शिंदे तसेच भगवान पाचोरे आदींचा शिक्षकांच्या हस्ते गौरव करण्यात आला यावेळी जालिंदर ताडगे ,अविनाश दवंगे ,नितीन हत्त सरपंच हेमंत झोले, कृष्णा घारे आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी शाळेतील शिक्षक उपस्थित होते.राष्ट्रीय बुद्धिबळपटू विनोद भागवत यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संच देऊन प्रशिक्षणाची हमी दिली. संदीप शिंदे यांनी क्रि केट संच भेट दिला .ज्ञानेश्वर काकड ,राजेंद्र सोनजे यांनी सूत्रसंचालन केले.कार्यक्र म यशस्वीतेसाठी हेमंत मेणे, शिवनाथ कडू ,राजेंद्र सोनजे, ज्ञानेश्वर काकड, प्रवीण भागवत ,संतोष भालेराव ,मुन्ना ठाकूर, महेश पाटील ,अण्णा भडांगे, अर्जुन कानकाटे ,महेश बोरसे ,प्रकाश ढोमसे , योगेश निमसे ,सुधीर देशमुख, वैभव शेलारआदी प्रयत्नशील होते.
महाराष्ट्र विद्यालयात 30 वर्षांनी भरली शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 1:51 PM
नाशिक:पुणे विद्यार्थी गृहाच्या महाराष्ट्र विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी तीन दशकांनंतर एकत्र येऊन तत्कालीन शिक्षक व सेवक वृंद यांसह पुन्हा शाळा ...
ठळक मुद्दे आठवणींना उजाळा: जिल्हभरातील माजी विद्यार्थंनी लावली हजेरी