शुभमंगल वार्ता : लॉकडाऊनमध्ये नोंदणी विवाहाला प्राधान्य
नाशिक: अनेकविध कारणांमुळे कुटुंबीयांकडून लग्नाला विरोध होत असेल अशा वेळी विवाहयोग्य मुलगा-मुलगी कायदेशीररित्या नोंदणी विवाहाचा मार्ग अवलंबितात. परंतु कोरोनातील निर्बंधामुळे नोंदणी पद्धतीने विवाह करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली असून गेल्या मार्च ते जुलै पंधरवड्यापर्यंत जिल्ह्यात ३०५ जोडप्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला आहे. विशेष म्हणजे उभयतांच्या कुटुंबीयांच्या साक्षीने राजीखुशीने असे विवाह पार पडले आहेत.
कोरोनाच्या निर्बंधामुळे जुळलेल्या विवाहांना अनेक अडचणी आल्या. एकतर लग्नाचा मुहूर्त जवळ आल्याने त्यांना मुहूर्तही चुकविणे शक्य नव्हते. याबारोबरच जास्त लोकही विवाहाला बोलविता येत नसल्याने अशावेळी नोंदणी पद्धतीचा विवाह हाच पर्याय समेार असल्याने या काळात नेांदणी पद्धतीने विवाह करणाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. मार्च ते जुलै २०२१ या कालावधीत नोंदणी पद्धतीने विवाह करणाऱ्यांची संख्या ३०५ इतकी आहे.
नोंदणी विवाहासाठी अवघे १५० रुपये इतके शुल्क लागते. त्यानुसार मार्च ते जुलै या कालावधीत अवघ्या ४५, ७५० रुपयांमध्ये ३०५ विवाह उरकले आहेत. मार्चपासून असलेल्या कोरोनाच्या काळात ठरवून नोंदणी विवाह करण्याचे प्रमाण अधिक असल्याने या निमित्ताने नोंदणी विवाह विषयक जनजागृतीदेखील होण्यास मदत झाली आहे.
कोरोनाच्या या कालावधीत ठरवून नोंदणी विवाह करणाऱ्यांची जशी संख्या वाढलेली दिसत. त्या प्रमाणात लग्नाची नोंदणी करण्यासाठी देखील दाम्पत्यांकडून प्राधान्य देण्यात आल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे. गेल्या चार महिन्यात अशा प्रकारच्या ५१ जोडप्यांनी आपल्या लग्नाची नोंदणी केलेली आहे.
--इन्फो--
विवाह कक्ष
नोंदणी पद्धतीने विवाह केला जात असला तरी केवळ कार्यालयात स्वाक्षरी करून विवाहाचे सोपस्कर पार पाडण्यापेक्षा आता नोंदणी कार्यालयातच वधूवर आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. लाल गालिचा टाकून विवाहाचा कक्ष आकर्षक करण्यात आला आहेे. नोंदणीची सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नोंदणी पद्धतीने या कार्यालयात विवाहाचे सोपस्कर पूर्ण केले जाते.
--इन्फो--
दीडशे रुपये नोंदणी शुल्क घेतले जाते. या पाच महिन्यांच्या कालावधीत ४३६ जोडप्यांनी लग्नाबाबतची नोटीस दिली होती. त्यापैकी ३०५ जणांचा विवाह पार पडला. १५० रुपये याप्रमाणे ४५,७५० रुपयांमध्ये येथे ३०५ विवाह पार पडले. नोंदणी विवाह करणाऱ्यांना आगाऊ नोटीस द्यावी लागते. या कालावधीत कुणाचीही हरकत आली तर अशा जोडप्यांचा विवाह कायदेशीररित्या लावून दिला जातो.
--इन्फो--
विशेष विवाह नोंदणी २०२१
मार्च - ९६
एप्रिल- ४४
मे - ५८
जून- ६२
जुलै- ४५
(गुड मॉर्निग पानासाठी)