शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
3
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
4
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
5
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
7
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
8
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
9
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
10
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
11
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
12
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
13
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
14
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
15
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
16
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
17
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
18
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
19
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
20
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?

इगतपुरीत अडकलेले ३०२ परप्रांतीय मजूर विशेष रेल्वेतून परराज्यांत रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2020 5:09 PM

सर्व ३०२ व्यक्तींना तपासणी करून संसर्ग नसल्याचा दाखला घेतल्यानंतर रवाना करण्यात आल्याची माहिती तहसिलदार अर्चना पागीरे यांनी दिली.

ठळक मुद्दे मजूरांना त्यांच्या मूळ गावी जाण्याचे आदेश धामणगाव ग्रामस्थांच्या वतीने एक पिकअप भरून विविध प्रकारचा भाजीपाला

नाशिक : मुंबई येथून निघालेल्या उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, बंगाल येथील ३०२ परप्रांतीय मजूरांना २१ एप्रिलरोजी इगतपुरीजवळील घाटनदेवी परिसरात पोलिसांनी रोखले होते. सदर मजूर पलायन करत असल्याने इगतपुरी पोलिसांनी रोखले होते. इगतपुरी येथिल शासकिय रूग्णालयात तपासणी करण्यासाठी त्यांना पाठविले. त्यानंतर या परप्रांतीय मजूरांना इगतपुरी तालुक्यातील पिंपरी सदो जवळील एकलव्य मॉडेल रेसिडेन्सी शाळेच्या हॉलमधील क्वॉरण्टाइन कक्षामध्ये ठेवण्यात आले होते. या मजूरांना त्यांच्या मूळ गावी जाण्याचे आदेश शासनाकडून मिळाल्यानंतर इगतपुरीत अडकलेल्या उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, बंगाल आदीं ठिकाणच्या नागरिकांना घेऊन जाण्यासाठी स्पेशल रेल्वेची व्यवस्था करून या सर्व ३०२ व्यक्तींना तपासणी करून संसर्ग नसल्याचा दाखला घेतल्यानंतर रवाना करण्यात आल्याची माहिती तहसिलदार अर्चना पागीरे यांनी दिली.या सर्व ३०२ मजूरांची व्यवस्था जवळच असलेल्या गुरूद्वारा समितीने केली. त्यांना एक वेळ नाश्ता चहा, दोन वेळचे जेवण अशी व्यवस्था केली होती. लोकसहभागातून इगतपुरी इगतपुरी येथिल जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण फलटणकर यांच्या नेतृत्वाखाली प्रतिष्ठाणच्या वतीने स्थलांतरित मजूरांना अत्यावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच मुंढेगाव येथील जिंदाल पॉलीफिल्म कंपनीकडून दैनंदिन वापरात येणार्या टुथपेस्ट, तेल, साबन, ब्रश चे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे इगतपुरी तालुक्यातील धामणगाव येथील ग्रामस्थांच्या वतीने एक पिक अप भरून विविध प्रकारचा भाजीपाला पागीरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गोरख बोडके यांनी देखील तालुक्यातील गरीब गरजूवंत, तसेच शिधापञकिा नसलेल्या नागरिकांना मोफत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करत मोलाची मदत केली. तालुक्यातील आरोग्य केंद्रातील अधिकारी तसेच अंगणवाडी सेविका, आरोग्यसेविका, आशासेविका यांनी देखील आपापल्या गावातील घरोघरी जाऊन सॅनिटायझरचे वाटप केले.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस