नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचे संकट गुरुवारी (दि. ६) अधिकच गडद झाले. नाशिक महानगरामध्ये तब्बल २२, तर ग्रामीणमध्ये नऊ अशी एकूण ३१ बळींची नोंद झाली आहे. आतापर्यंतच्या तुलनेत जिल्ह्यात एकाच दिवशी मृत्यू झालेल्याचे गुरुवारचे बळी हे सर्वाधिक ठरले आहे.नाशिक जिल्ह्यात जुलैचा उत्तरार्ध आणि आॅगस्टच्या प्रारंभापासून बळींच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. गत आठवड्यात कोरोनामुळे एका दिवसात सर्वाधिक सतरा मृत्यू झाले होते. कोरोनाच्या प्रारंभापासून गट आठवड्यापर्यंत झालेल्या एका दिवसातील मृत्यूमध्ये १७ हा सर्वाधिक मोठा आकडा ठरला होता; मात्र त्यानंतर अवघ्या तीन दिवसात सर्वाधिक बळींच्या संख्येत आत्तापर्यंतचा सर्वात अधिक असा ३१चा आकडा गाठला गेला त्यामुळे आतापर्यंतच्या जिल्ह्यातील बळींची संख्या ५७८वर पोहोचली आहे. गुरुवारचा एका दिवस दिवसभरात आतापर्यंतच्या बळींच्या तुलनेत जवळपास दुप्पट बळी एकाच दिवशी जाण्याची घटना ही आरोग्य विभागासह संपूर्ण शहरालादेखील चक्र ावून सोडणारी ठरली आहे.नाशिक शहरात गुरुवारी कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्ती या ३५ ते ७५ वयोगटातील आहेत. जुने नाशिक, वडाळा, पंचवटी, तपोवन, सिडको, सातपूर, नाशिक रोड, महात्मा नगर आदी परिसरातील मृतांचा त्यात समावेश आहे, तर ग्रामीण मध्ये झालेल्या मृतांमध्ये सिन्नर, मालेगाव, माडसांगवी या भागातील बाधितांचा समावेश आहे.गुरु वारी तब्बल ११४६ नवीन बाधितांची त्यात भर पडली आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या बाधितांचा आकडा १८४४४ वर गेला आहे. त्यातील १३ हजार ३३५ रु ग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या रु ग्णांची संख्या ४५३१ वर गेली आहे. प्रलंबित अहवालांची संख्या ११९१ झाली असल्याने चिंता कायम आहे. सद्यस्थितीत सिन्नरला २२६, देवळाली १०४, मालेगाव ५७, बागलाण ३८, नांदगाव ९२, निफाड १८४ रुग्णांवर उपचार सुरू आहे.
एकाच दिवसात ३१ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2020 1:22 AM
जिल्ह्यात कोरोनाचे संकट गुरुवारी (दि. ६) अधिकच गडद झाले. नाशिक महानगरामध्ये तब्बल २२, तर ग्रामीणमध्ये नऊ अशी एकूण ३१ बळींची नोंद झाली आहे. आतापर्यंतच्या तुलनेत जिल्ह्यात एकाच दिवशी मृत्यू झालेल्याचे गुरुवारचे बळी हे सर्वाधिक ठरले आहे.
ठळक मुद्देकोरोनाचे संकट कायम : प्रलंबित अहवाल ११९१वर