सर्वसामान्य युवकांनी ४२ आठवड्याचे खडतर सैनिकी प्रशिक्षण पूर्ण करत स्वत:ला भारताचे सैनिक बनविले. या नवसैनिकांनी तोफखान्याचे कमांडंट ब्रिगेडियर जे.एस. गोराया यांनी परेड संचलनाचे निरीक्षण करत नवसैनिकांचा गौरव केला. शपथविधीसाठी होवित्झर, बोफोर्स, सॉल्टम, मल्टिरॉकेट लॉन्चर यांसारख्या तोफा मैदानावर आणण्यात आल्या होत्या. नवसैनिकांच्या तुकडीने मैदानावर संचलन करत उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. यावेळी नवसैनिकांचे गोराया यांनी भारतीय सैन्यदलात स्वागत करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. नवसैनिकांनी नेहमीच ‘सैनिक’ धर्म बजावावा आणि भारताची सेवा करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून रोहित कुमार यांना गौरविण्यात आले.
दरम्यान, यावेळी नवसैनिकांच्या माता-पित्यांना यावेळी ब्रिगेडियर गोराया यांच्या हस्ते गौरव पदक समारंभपूर्वक सन्मानाने प्रदान करण्यात आले. या सोहळ्यादरम्यान, लष्करी बॅन्डने वाजविलेल्या देशभक्तीपर गीतांच्या धूनने लक्ष वेधून घेत सोहळ्याचे आकर्षण वाढविले. दरवर्षी या तोफखान्यातून शेकडो नवसैनिक ‘तोपची’च्या भूमिकेत भारतीय सैन्यदलात दाखल होतात.
---
फोटो आर वर १४आर्मी नावाने सेव्ह केला आहे.