नाशिक : जिल्ह्यात शनिवारी (दि.५) ३७१ नवे बाधित मिळाले, तर ३११ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. नाशिक शहरात ४ तर ग्रामीणला २ याप्रमाणे ६ जणांचा बळी गेल्याने एकूण बळींची संख्या १८२६ वर पोहोचली आहे.
जिल्ह्यातील कोराेनाबाधित रुग्णांची संख्या आतापर्यंत १ लाख २ हजार ९१९ वर पोहोचली असून, त्यातील ९७ हजार ८०० रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या ३२९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९५.०३ वर पोहोचली आहे. त्यात नाशिक शहरात ९५.९८, नाशिक ग्रामीणला ९३.२१, मालेगाव शहरात ९३.०१, तर जिल्हाबाह्य ९३.२३ असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या ३,२९३ बाधित रुग्णांमध्ये १८०५ रुग्ण नाशिक शहरात, १,३३७ रुग्ण नाशिक ग्रामीणला, १३५ रुग्ण मालेगावमध्ये, तर १६ रुग्ण जिल्हाबाह्य क्षेत्रामधील आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत करण्यात आलेल्या चाचण्यांची संख्या तीन लाख ९० हजार ४९ असून, त्यातील दोन लाख ८५ हजार ९६२ रुग्ण निगेटिव्ह, तर १ लाख २९१९ रुग्ण बाधित आढळून आले असून, १,१६८ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.