शहरं
Join us  
Trending Stories
1
"मनात पक्कं केलंय, अशा लोकांविरोधात..."; शायना एनसी यांची अरविंद सावंतांवर खरमरीत टीका
2
एकनाथ शिंदेंच्या विधानानंतर मनसेचा हल्लाबोल; कल्याणची आठवण करून देत म्हणाले...
3
'लाडकी बहीण' योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे केव्हा मिळणार? मुख्यमंत्र्यांनी दिली आनंदाची बातमी!
4
"काठीने मारहाण, ३ दिवस टॉयलेटमध्ये बंद"; सावत्र बाप झाला हैवान, चिमुकल्यांनी मांडली व्यथा
5
अमित ठाकरे-सदा सरवणकर वाद: CM एकनाथ शिंदे म्हणतात, "मी राज ठाकरेंना तेव्हाच विचारलं होतं..."
6
प्रशांत किशोर एका निवडणुकीत सल्ला देण्यासाठी किती कोटी रुपये घेतात? स्वतःच केला खुलासा; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
Apple ची भारतात विक्रमी कमाई; iPhone ची बंपर विक्री, टिम कुक यांची ४ नवी स्टोअर्स उघडण्याची घोषणा
8
IND vs NZ: सोधीचा चेंडू हातभर वळला अन् 'शतकी' उंबरठ्यावर फुटली शुबमन-पंत सेट झालेली जोडी
9
पेंट तयार करणाऱ्या 'या' दिग्गज कंपनीची होणार विक्री; अदानी, JSW सह दिग्गजांची नजर; शेअरमध्ये तेजी
10
आलिया-रणबीरने लाडक्या राहासोबत केलं दिवाळीचं जंगी सेलिब्रेशन! सोनेरी कपड्यांमध्ये सजलं कपूर कुटुंब
11
IPL २०२५ आधी ८.५ कोटींचा 'बोनस'; भारतीय पठ्ठ्यानं ऑस्ट्रेलियात सेंच्युरीसह साजरी केली 'दिवाळी'
12
Bhai Dooj 2024: यमुनेने यमराजाकडे काय भाऊबीज मागितली आणि तिला ती मिळाली का? वाचा!
13
UPI युझर्ससाठी गूड न्यूज; १ नोव्हेंबरपासून बदलले 'हे' २ नियम; कोणाला मिळणार फायदा?
14
Tarot card: येत्या आठवड्यात होणार संयमाची परीक्षा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: "कारवाई होणारच, हा लढा महिलांच्या सन्मानासाठी"; शायना एनसी यांचे रोखठोक प्रत्युत्तर
16
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगने दिवाळीत दाखवली लेकीची पहिली झलक, ठेवलं हे नाव
17
आजपासून सुरू होणाऱ्या कार्तिक मासाचे आणि सणांचे महत्त्व जाणून घ्या!
18
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान एक वर्षांपासून कैदेत; तुरुंगात हलायलाही नाही जागा!
19
तुम्हीही SIP द्वारे गुंतवणूक करता? 'या' ५ Mutual Funds नं ५ वर्षांत दिलाय ३० टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न
20
कॅनडा-भारत तणावपूर्ण वातावरणात PM ट्रुडो यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा, हिंदूंबद्दल म्हणाले...

मनपा शाळांतील ३१५ शिक्षकांच्या बदल्या

By admin | Published: May 26, 2016 11:05 PM

समुपदेशनावर भर : ३१ मे पर्यंत रुजू होण्याचे आदेश

 नाशिक : शिक्षक बदलीचा कार्यक्रम म्हटला की, त्यात वशिलेबाजी, राजकीय हस्तक्षेप, संघटनांचे दबावगट या साऱ्या गोष्टी आल्याच. परंतु, महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच कसलाही गाजावाजा न होता शाळांमधील शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया पार पडली असून आॅनलाइन प्रक्रिया राबविताना समुपदेशनावर अधिक भर देण्यात आला आहे. वास्तव्य ज्येष्ठताक्रमानुसार मनपा शाळांमधील ३१५ शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. शिक्षण विभागाने बदलीपात्र शिक्षकांना ३१ मे पर्यंत संबंधित शाळांवर रुजू होण्याचे आदेश काढले आहेत. महापालिकेच्या शाळांमध्ये एकूण ९३६ शिक्षक कार्यरत आहेत. गेल्या चार-पाच वर्षांत शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया थांबलेली होती. यापूर्वी, शिक्षकांच्या बदल्या हाच एकमेव अजेंडा शिक्षण समितीचा असायचा. त्यातून मोठ्या प्रमाणावर वादही निर्माण व्हायचे. शिक्षण मंडळ बरखास्त होऊन शासनाने शिक्षण समितीची स्थापना करण्याचे आदेश दिल्यानंतर शिक्षण विभाग हा पूर्णत: महापालिकेच्या कार्यकक्षेत आला. मनपा आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी महापालिकेतील अधिकारी, अभियंत्यांसह लिपिक या संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या केल्यानंतर शिक्षकांच्या बदल्यांचाही विषय समोर आला. त्यानुसार, यंदा प्रथमच शिक्षण विभागामार्फत शिक्षकांच्या समुपदेशनावर भर देत रिक्त जागा दाखवून आॅनलाइन पद्धतीने बदलीचा कार्यक्रम राबविण्यात आला. शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी उमेश डोंगरे यांनी त्यानुसार वास्तव्य ज्येष्ठता यादी तयार करून शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया नुकतीच पूर्ण केली. त्यानुसार, ५७२ पैकी २१६ उपशिक्षक, १०३ पैकी ४२ मुख्याध्यापक आणि २६१ पैकी ५७ पदवीधर शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्यांची प्रक्रिया राबविताना अपंग, विधवा, गंभीर आजारी तसेच ज्यांचा सेवाकाळ एक वर्षापुरता राहिला आहे, अशा शिक्षकांना त्यातून वगळण्यात आले आहे. बदलीपात्र शिक्षकांना त्यांच्या बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी त्यांना ३१ मे पर्यंत कार्युमक्त करण्याचे आदेश शिक्षण विभागाने संबंधित शाळा मुख्याध्यापकांना काढले आहेत.