4 आरोपी पोलिसांच्या ताब्यात
कसबे सुकेणे: बंद असलेल्या निफाड सहकारी साखर कारखान्याच्या पश्चिम बाजूकडील भिंतीचे बॉयलर हाऊसच्या जवळ असलेले तांब्याचे पाईप व पितळाचे ॲम्पियर असे एकूण ३३ हजार रुपयांचे साहित्य चोरीस गेल्याची घटना समोर आली आहे. या चोरीबाबत पोलिसांनी चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती निफाड पोलिसांनी बुधवारी (दि. ८) दिली.
निफाड तालुक्यातील भाऊसाहेब नगर पिंपळस येथील निफाड सहकारी साखर कारखान्याच्या असलेल्या भिंतीलगत उघड्यावर असलेले ७ हजार रुपये किमतीचे २ कोअर ॲल्युमिनियम तीनशे फूट लांबीचे वायर बंडल, १६ हजार रुपये किमतीचे ॲम्पिरियर ८९.४ हजार रुपये किमतीचे डिस्टन्स पीस कॅप पितळी, ६ हजार रुपये किमतीचे चार नग मोठे कॅपरचे पाईप असे एकूण ३३ हजार रुपयांचे साहित्य छोटा हत्ती (एमएच ०४ सीजी ७३९४) मध्ये टाकून चोरी करून नेले असल्याची फिर्याद निसाकाचे
प्राधिकृत अधिकारी तथा विभागीय अधिकारी जिल्हा बँक मॅनेजर काशीनाथ वाटपाडे (५१) यांनी निफाड पोलिसांत दिली आहे, याबाबत निफाड पोलिसांनी आरोपी अब्दुल वहीद किफायत उल्ल चौधरी (४०, राहणार सरकारी दवाखान्याजवळ, निफाड, जनार्दन शिवराज लोदी (२८, राहणार शिवरे फाटा, राकेश शत्रुघन यादव (३२), राहणार शिवरे फाटा, रामराज राजीव दौंड (२६, राहणार सरकारी दवाखान्याजवळ, निफाड या चार आरोपींना मंगळवारी (दि. ७) संध्याकाळी उशिरा ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर चोरीचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीरंग सानप, अमोल पवार पोलीस हवालदार लहरे हे करत आहेत.