नाशिकरोड : उन्हाळा ऋतूच्या अखेरीपर्यंत उन्हाचा चटका व पाण्याची टंचाई भासत असल्याने नाशिक विभागामध्ये ३०३ गाव व ३२६ वाड्यांमध्ये ३३२ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. राज्य शासनाकडून सर्वत्र जलसिंचनाकरिता मोठ्याप्रमाणात आर्थिक निधी उपलब्ध करून सुद्धा पाण्याची टंचाई गेल्यावर्षी पेक्षा यंदा जास्तचगाव व वाड्यांमध्ये जाणवत आहे. त्यामुळे शासनाकडून नाशिक तालुक्यातील २६२ गाव-वाड्यांमध्ये ७५ ट्रॅक्टरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. धुळे जिल्ह्यातील १८ गावांमध्ये १६ टॅँकर, नंदुरबार जिल्ह्यातील २ गावामध्ये १ टॅँकर, जळगाव जिल्ह्यातील १३४ गावांमध्ये १०५ टॅँकर व अहमदनगर जिल्ह्यातील २१३ गाव-वाड्यांमध्ये ५४ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. नाशिक विभागात जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, नंदुरबार जिल्ह्यात फक्त एकाच टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.नाशिक जिल्ह्यातील टॅँकर संख्या४बागलाण तालुक्यात २२ गाव-वाड्यांमध्ये १५ टॅँकर, देवळा ६ गाव-वाड्यांमध्ये ३ टॅँकर, मालेगाव ४० गाव-वाड्यांमध्ये ८ टॅँकर, नांदगाव ५३ गाव-वाड्यांमध्ये ६ टॅँकर, पेठ ६ गाव-वाड्यांमध्ये २ टॅँकर, सुरगाणा ६ गाववाड्यात २ टॅँकर, सिन्नर ४० गाव वाड्यांमध्ये ११ टॅँकर, त्र्यंबक २३ गाववाड्यांमध्ये ४ टॅँकर, येवला ६६ गाववाड्यांमध्ये २४ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. नाशिक जिल्ह्यातील २६२ गाव-वाड्यांमध्ये ७५ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.३९२ विहिरी अधिग्रहणनाशिक जिल्ह्यात ४७ विहिरी, धुळे जिल्ह्यात ८२ गावांतील ९९ विहिरी, नंदुरबार जिल्ह्यातील ४५ गावांतील ४८ विहिरी, जळगाव जिल्ह्यात १९४ गावात १९६ विहिरी, अहमदनगर जिल्ह्यात ११ गावांमध्ये दोन विहिरी पाण्यासाठी अधिग्रहण करण्यात आल्या आहे.
विभागात ३३२ टँकरने पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2018 1:37 AM