मनमाड : दिवाळी व छट पूजेसाठी उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने ३४ दिवाळी व छट उत्सव विशेष रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांना मनमाडसह नाशिक येथे थांबे देण्यात आले असल्याने परिसरातील प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे.
गाडी क्रमांक ०१२३५ लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर विशेष वातानुकूलित साप्ताहिक विशेष गाडी ( आठ फेऱ्या) लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. २ ते २३ नोव्हेंबर पर्यंत दर मंगळवारी दुपारी ४.४० वाजता सुटेल आणि गोरखपूर येथे दुसऱ्या दिवशी रात्री ११.५५ वाजता पोहोचेल. विशेष साप्ताहिक गाडी दर गुरुवारी गोरखपूर येथून पहाटे ४.१५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १२.१५ वाजता पोहोचेल. लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर विशेष अतिजलद साप्ताहिक (8 फेऱ्या)
ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. ५ ते २६ नोव्हेंबरपर्यंत दर शुक्रवारी दुपारी १.४० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६.५० वाजता गोरखपूरला पोहोचेल. विशेष अतिजलद साप्ताहिक गाडी दर शनिवारी रात्री ९.१५ वाजता गोरखपूर येथून सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तिसऱ्या दिवशी पहाटे ३.४५ वाजता पोहोचेल. लोकमान्य टिळक टर्मिनस - समस्तीपूर विशेष अतिजलद (6 फेऱ्या) गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १ ते १५ नोव्हेंबरदरम्यान दर सोमवारी दुपारी ३.५० वाजता सुटेल आणि समस्तीपूर येथे तिसऱ्या दिवशी पहाटे ३ वाजता पोहोचेल. विशेष अतिजलद साप्ताहिक समस्तीपूर येथून
दर बुधवारी सकाळी ७.२५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६.१५ वाजता पोहोचेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-भागलपूर विशेष अतिजलद साप्ताहिक (६ फेऱ्या)गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १ ते १५ नोव्हेंबरदरम्यान
दर सोमवारी सकाळी ११.०५ वाजता सुटेल आणि भागलपूर येथे दुसऱ्या दिवशी रात्री ९.२५ वाजता पोहोचेल.
विशेष अतिजलद साप्ताहिक गाडी भागलपूर येथून दर बुधवारी सकाळी १० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी रात्री ११ वाजता पोहोचेल. पुणे-बनारस विशेष अतिजलद साप्ताहिक (६ फेऱ्या)
गाडी १ ते १५ नोव्हेंबरदरम्यान दर सोमवारी पुणे येथून रात्री ८.५० वाजता सुटेल आणि बनारस येथे दुसऱ्या दिवशी रात्री ११.१० वाजता पोहोचेल. विशेष अतिजलद साप्ताहिक गाडी दर बुधवारी रात्री १.१० वाजता बनारस येथून सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ६.२५ वाजता पोहोचेल.
इन्फो
कोविड नियमांचे होणार पालन
फक्त कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच बोर्डिंग, प्रवास आणि गंतव्यस्थानी कोविड-१९ शी संबंधित सर्व नियमांचे पालन करून या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी दिली जाणार असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे. प्रवाशांनी या नियमांचे पालन करीत रेल्वेला सहकार्य करावे असे आवाहनही करण्यात आले आहे.